Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही कलाकार आहोत, फॅक्ट्री प्रोडक्ट नाही...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर पंकज त्रिपाठींची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:04 IST

"कलाकाराने ब्रेक घेणं गरजेचं, कारण...",अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयाला पंकज त्रिपाठींचा पाठिंबा, म्हणाले-"या धावपळीत…"

Pankaj Tripathi On Arijit Singh Retirement: भारतीय संगीत क्षेत्रातील कोट्यवधी चाहत्यांचा लाडका पार्श्वगायक अरिजीत सिंहने अलिकडेच सिनेमांसाठी पार्श्वगायन करणार नाही, अशी घोषणा केली. साहजिकच त्याचा हा निर्णय चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. रिअॅलिटी शो ते बॉलिवूडचा टॉपचा गायक हा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे. आता त्याच्या या निर्णयावर अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. शिवाय त्यांनी अरिजीतच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

अरिजीत सिंगने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्याची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर असतात .दरम्यान, गायकाने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे निवृत्तीची घोषणा केली. अरिजीत सिंगच्या या निर्णयावर अभिनेते पंकड त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, "आम्ही कलाकार आहोत, फॅक्टरी प्रोडक्ट नाही.सत्य हे आहे की, या प्रसिद्धी आणि ग्लॅमरच्या मागे खूप धावपळ आहे. त्यामुळे ब्रेक घेणं गरजेचं आहे. कोणताही कलाकार असो तो ज्या आज ज्या ठिकाणी हे  त्याने  वर्षानुवर्षे केलेल्या संघर्षाचं आणि मेहनतीचं फळ आहे."

यानंतर मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी म्हणाले,"सेटवर जाण्याचा उत्साह तेव्हाच राहतो जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता.पण हा उत्साह कायम टिकून राहतो, असंही नसतं.या धावपळीत थकवून जाण्यापेक्षा स्वतःच्या अटींवर काम करणं चांगलं. त्यामुळे जर एखाद्या कलाकाराला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा असेल तर त्यात चुकीचं असं काहीच नाही.  शिवाय अरिजीत सिंगसारख्या गायकाने हा निर्णय घेतला असेल तर त्यामागे त्याचा नक्कीच काहीतरी विचार असावा." असं मत त्यांनी मांडलं. 

गेल्या काही वर्षांत अरिजीतने हिंदी चित्रपटसृष्टीला  एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. तुम ही हो,चन्ना मेरेया,अगर तुम साथ हो, आणि केसरिया सारख्या गाण्यांनी त्याने सर्वांच्या मनात घर केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Arijit's retirement: Pankaj Tripathi supports singer's decision, emphasizes artist's need for breaks.

Web Summary : Pankaj Tripathi backs Arijit Singh's decision to retire from playback singing, stating artists need breaks from the demanding industry. He highlighted the importance of working on one's own terms and prioritizing personal well-being over constant pressure. Tripathi acknowledged Singh's immense contribution to music.
टॅग्स :अरिजीत सिंहपंकज त्रिपाठीबॉलिवूडसेलिब्रिटी