Neil Nitin Mukesh: काही जुने चित्रपट वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्या चित्रपटांची क्रेझ काही केल्या कमी होत नाही. असाच एक बॉलिवूड चित्रपट म्हणजे 'जाने तू या जाने ना'. अभिनेता इमरान खान (Imran Khan) आणि जिनिलिया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला. आमिर खानचा भाचा म्हणजेच इमरान खानने या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. २००८ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश वेड लावलं होतं. पणआश्चर्य वाटेल की 'जाने तू या जाने ना' साठी इम्रान खान निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता. त्याच्या आधी या चित्रपटाची ऑफर अभिनेता नील नितीन मुकेशला (Neil Nitin Mukesh)देण्यात आली होती. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्याने हा किस्सा शेअर केला.
नील नितीन मुकेशने त्याच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत ची एक छाप उमटवली आहे. आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊळ ठेवत अभिनेत्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. अलीकडेच, जस्ट टू फॅमिलीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, जाने तू या जाने ना चे निर्मात्यांची त्याला या चित्रपटात कास्ट करण्याची इच्छा होती असा खुलासा नील नितीन मुकेशने केला आहे. त्याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, "निर्माता झुम्मू सौगंधने मला एकाच वेळी जॉनी गद्दार आणि जाने तू या जाने ना ऑफर केली. त्यादरम्यान त्यांनी मला यापैकी कोणताही एक चित्रपट निवडण्यास सांगितलं. मला वैयक्तिकरित्या 'जाने तू या जाने ना' खूप आवडला, कारण तो एक प्रेमकथेवर आधारित चित्रपट होता आणि त्या काळात तो एक ट्रेंड होता. "
आजही मला त्या गोष्टीचा पश्चाताप...
पुढे अभिनेता म्हणाला, पण, चॉकलेट बॉयच्या नजरेने मला कोणी पाहू नये, अशी माझी इच्छा होती, म्हणून मी नेगेटिव्ह पात्र साकारायचं ठरवलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाची कथा वाचण्याची संधी मिळाली. पण, आजही मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. खरं बोलायचं झालं तर 'जाने तू या जाने ना' चित्रपट इम्रानच्या नशिबात होता. असा खुलासा अभिनेत्याने केला.
दरम्यान, 'जाने तू या जाने ना' या चित्रपटात इम्रान खान, जिनिलिया देशमुख, मंजिरी फडणीस, प्रतीक पाटील आणि अयाज खान अशा कलाकारांची फौज पाहायला मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.