Sunita Ahuja :बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा (Govinda) अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या हा अभिनेता आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) एकमेकांपासून वेगळे होत, घटस्फोट घेत असल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरत आहे. त्यामुळे हे जोडपं प्रचंड चर्चेत आहे. अशातच एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा असतानाच सुनीता अहुजाने एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान,गोविंदा आणि सुनीता नेहमीच बॉलिवूडमध्ये एक आदर्श उदाहरण म्हणून पाहिली जात होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीताने ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. त्यातच अलिकडेच सुनीता आहूजाने ईट ट्रॅव्हल रिपीट ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे तिचे किशोवयीन काळात क्रश होते,शिवाय त्यांच्यामुळे गोविंदासोबत लग्न केलं असंही तिने सांगितलं.त्यावेळी मुलाखतीत सुनीता म्हणाली, "मला दुसरं कोणी आवडत नाही. शाहरुख मला आजही खूप आवडतो. तो एक सज्जन माणूस आहे. पण, मी किशोरवयीन असताना मला धरमजी खूप आवडायचे. मी गोविंदासोबत लग्न केलं कारण तो अगदी तेव्हा धरमजींसारखा दिसायचा. शिवाय दोघेही पंजाबी होते."
त्यानंतर पुढे सुनीता आहुजाने म्हटलं की, सॅंडविच या चित्रपटात गोविंदाने धर्मेंद्र यांच्यापासून प्रेरित होऊन भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातील गोविंदाचा अभिनय पाहून मला धर्मेंद्र आठवायचे. त्यातबरोबर सुनीताने सांगितलं की याची कबुली थेट धर्मेंद्र यांच्यासमोर दिली आहे. त्याविषयी बोलताना ती म्हणाली,"मी एकदा धर्मेंद्र यांना म्हटलं होतं की, मी गोविंदासोबत लग्न केलं कारण, ते तुमच्यासारखे दिसतात."
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या संसाराला ३८ वर्ष झाली आहेत.साल १९८७ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.या जोडप्याला टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत.