Join us

"मला वाटलं माझं करिअर संपलं...", बॉलिवूड अभिनेत्याची 'ती' एक चूक श्रीदेवींना पडली असती महागात; काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:19 IST

"श्रीदेवी सेटवर पाय घसरून पडल्या अन्...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितली ३५ वर्षांपूर्वी घडलेली घटना, म्हणाला

Farhan Akhtar:फरहान अख्तर हा इंडस्ट्रीतील हा उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम निर्माता म्हणूनही ओळखला जातो. भाग मिल्खा भाग चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारून त्याने सर्वांची मनं जिंकली. मात्र, फार कमी लोकांना माहित आहे की फरहान अख्तर करिअरच्या सुरुवातीला असिस्टंट म्हणूनही काम पाहिलं आहे. प्रसिद्ध बॉलिवूड सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंह यांच्या लम्हे चित्रपटासाठी काम केलं. साल १९९१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एके दिवशी लम्हे चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर श्रीदेवी, अनिल कपूर आणि मनमोहन सिंह यांच्यासह अभिनेता फरान अख्तर देखील उपस्थित होता. त्या दरम्यान, एका गाण्याचं शूट करताना श्रीदेवी पाय घसरून पडल्याने फरान प्रचंड घाबरला. या घडल्या प्रकारामुळे आपल्या करिअर संपलं, अशी भीती अभिनेत्याला वाटू लागली होती. त्यावेळी नेमकं काय घडलेलं सविस्तर जाणून घेऊया...

नुकतीच फरान अख्तरने आपकी अदालत मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अभिनेत्याने लम्हेच्या सेटवर घडलेला तो प्रसंग सांगितला. तेव्हा फरान म्हणाला, "त्यावेळी मी असिस्टंट कॅमेरामनचं काम करायचो. मी मनमोहन सिंह याचा सातवा की आठवा असिस्टंट होतो. तो श्री देवी यांच्या नृत्याचा सीन असल्याने त्यातून राग, दुख त्यांना व्यक्त करायचं होतं. त्याआधी सरोज खान आणि त्यांच्यामध्ये डान्सबद्दल बोलणं झालं होतं. त्याचदरम्यान, एका कॅमेरामनने मला सांगितलं की फरशीवर डाग दिसतोय. श्रीदेवी तेव्हा तिथेच सराव करत होत्या.

काय घडलेलं?

"त्यानंतर मी तिथेच असल्याने तो डाग पुसण्यासाठी गेलो.एक बादली पाणी आणि एक कापड घेऊन मी तो डाग पुसून काढला.अचानक, श्रीदेवीजी पुढे आल्या, त्यांचा पाय घसरला आणि त्या माझ्या समोर पडल्या. श्रीदेवी पडताच सगळीकडे शांतता पसरली. मला वाटलं माझं इंडस्ट्रीतील करिअर संपलं. पण, श्रीदेवी यांनी माझी बाजू सावरली, त्या हसायला लागल्या.जेव्हा इतरांनी त्याला हसताना पाहिले तेव्हा तेही मोठ-मोठ्याने हसायला लागले." असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने शेअर केला.

फरहान लवकरच '१२० बहादूर' या युद्धपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका खऱ्या लष्करी घटनेवर आधारित आहे.येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farhan Akhtar feared career's end after Sri Devi nearly fell.

Web Summary : Farhan Akhtar, assisting on 'Lamhe,' accidentally caused Sri Devi to slip. He feared his career was over, but Sri Devi laughed it off, easing the tension. He shared this incident during an interview. He will appear in '120 Bahadur'.
टॅग्स :फरहान अख्तरश्रीदेवीबॉलिवूडसिनेमा