Devanand Movie:बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते, चॉकलेट हिरो अशी ख्याती असलेले अभिनेते देवानंद (Devanand). देवानंद यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रत्येक भूमिकेला न्याय देत त्यांनी चाहत्यांच्या मनावर नाव कोरलं. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळेच त्यांना चाहते ‘देवानंद’ या नावाने ओळखू लागले. त्याचबरोबर 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया "आणि 'अभी ना जाओ छोड़कर" यांसारखी चित्रपटातील गाणी आजही स्मरणात आहेत आणि जपली जातात. आज या लोकप्रिय अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१९५६ हे वर्ष देव आनंदसाठी खूप लकी ठरलं, कारण त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि कमाईच्या बाबतीत इतिहास रचला. या चित्रपटाचं नाव सीआयडी' आहे. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात देवानंद यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. एका खुनाचा तपास करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील यश आणि कथानक सादरीकरणातील कलात्मक गुणवत्तेमुळे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. सस्पेन्स आणि खुनाचा थरार असलेला हा चित्रपट क्राईम मिस्ट्री सिनेमाची त्याकाळी चांगलीच चर्चा रंगली होती.
या सस्पेन्स, थ्रिलर सिनेमात देवानंद यांच्यासह शकीला आणि वहीदा रहमान या अभिनेत्री देखील होत्या.'सीआयडी' मधून वहिदा रहमान यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासाची सुरुवात झाली. ज्या काळात चित्रपटांचे बजेट केवळ लाखोंमध्ये होते. त्या काळात 'सीआयडी'ने केवळ बॉक्स ऑफिसवर ५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली.त्याकाळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.