Join us

"तिच्या तोंडाचा वास आला अन्...",  'या' अभिनेत्रीसोबत रोमॅंटिक सीन करताना बॉबी देओलचे झालेले हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:55 IST

"तिच्या तोंडाचा वास आला अन्...",  रोमॅंटिक सीन करताना अभिनेत्याच्या नाकी नऊ आले! केलं असं काही की...

Bollywood Movie: सिनेमा म्हटलं की किस्से हे आलेच. कलाकार काम करताना पडद्यामागे कोणत्या गमती जमती घडतात हे जाणून घेण्यास  प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते. आजवर अशा अनेक चित्रपटांचे किस्से आपल्या कानावर आले असतील. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'गुप्त' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता बॉबी देओलसोबतही एक विचित्र किस्सा घडला होता. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने याबद्दल सांगितलं. 

साइकोलॉजिकल क्राइम थ्रिलर चित्रपट गुप्तमध्ये बॉबी देओल, मनिषा कोईराला आणि काजोल प्रमुख भूमिकेत होते. हे त्रिकुट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. याच दरम्यान, अभिनेता बॉबी देओलने गुप्त चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा शेअर केला होता. फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने मनिषा कोईरालासोबतच्या त्या सीनविषयीचा मजेशीर किस्सा सांगितला. तेव्हा तो म्हणाला, माझं आणि मनिषाचं कधीच पटलं नाही त्यामुळे आमच्यात मैत्री झाली नाही. एकावेळी बेचैनिया गाण्याची शूटिंग सुरु होती. त्यामध्ये ती माझ्या जवळ येऊन हनुवटीला चावते असा तो सीन होता. पण, ती माझ्या जवळ येताच तिच्या तोंडाचा वास येऊ लागला. त्या वासाने माझ्या डोक्यात झिणझिण्या आल्या. मी हे सगळं दिग्दर्शकाला सांगितलं होतं.

दरम्यान, हा सीन शूट करण्यापूर्वी मनिषाने चणाचाट व कच्चा कांदा खाल्ला होता. हा वास इतका होता की सीन चित्रित करताना अक्षरशः त्याला त्याचा श्वास रोखून धरावा लागला होता. मात्र, त्यानंतर हा रोमँटिक सीन यशस्वीरित्या शूट करण्यात आला. पण, हाच प्रकार बॉबी देओलने मनिषा ,सोबत करण्याचं ठरवलं. एका चित्रपटाच्या मुख्य नायकाला मनिषालसोबत रोमॅंटिक सीन करताना कांदा खाऊन जा असा सल्ला दिला होता. मात्र, त्याचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही.  

टॅग्स :बॉबी देओलमनिषा कोईरालाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा