Rajat Bedi: हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून कारकिर्द सुरु करुन नंतर सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकांकडे वळणारे व यशस्वी होणारे जे मोजके अभिनेते आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे रजत बेदी. ९० च्या दशकातील बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. परंतु, 'कोई मिल गया' चित्रपटात खलनायक साकारुन रजत बेदी चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता.मात्र, त्यानंतर तर तो अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला.२० वर्षानंतर रजतने आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमधून इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. त्यात आता एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. त्यामुळे सगळ्याच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.
अलिकडेच रजत बेदीने डिजीटल कमेंटरी सोबत संवाद साधला. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला,"लोक फक्त माझं कमबॅक पाहत आहेत. मात्र, गेली २० वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. त्या परिस्थितीतही माझ्या पत्नीने माझी साथ सोडली नाही. माझ्यासोबत तिनेही खूप त्रास सहन केला. आता लोक मला ओळखत आहेत आणि याचा आनंद माझ्या कुटुंबाला देखील होत आहे." अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केला.
अभिनयाकडे पाठ फिरवून रजत कॅनडामध्ये झालेला स्थायिक
एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रजत बेदी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत परदेशात स्थायिक झाला. कॅनडामध्ये तो रिश इस्टेटचा व्यवसाय करत होता. मात्र, त्यातही अनेकांनी त्याची फसवणूक केली होती. याचा खुलासा स्वत रजतने केला होता. रजत बेदीने 'कोई मिल गया' चित्रपटाव्यतिरिक्त रजतने ' चालबाज', 'जानी दुश्मन:अनोखी प्रेम कहाणी' तसेच 'रॉकी' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.सध्या तो आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने जज सक्सेना नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
Web Summary : Rajat Bedi, known for villainous roles, faced a challenging 20-year hiatus, including real estate struggles in Canada. His wife's support was crucial. He's now back with 'Bad Boy Billionaires: India'.
Web Summary : खलनायक भूमिकाओं के लिए जाने जाने वाले रजत बेदी ने कनाडा में रियल एस्टेट संघर्षों सहित 20 वर्षों का कठिन अंतराल झेला। उनकी पत्नी का समर्थन महत्वपूर्ण था। अब वह 'बैड बॉय बिलियनेयर्स: इंडिया' के साथ वापस आ गए हैं।