Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दोन वर्षांनी बॉलिवूड अभिनेता होणार बाबा, गरोदर पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:27 IST

'लव्ह सेक्स धोका' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, लवकरच होणार बाबा

'लव्ह सेक्स धोका' फेम अभिनेता अंशुमन झा लवकरच बाबा होणार आहे. अंशुमनच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अंशुमनची पत्नी सिरीया गरोदर आहे. सोशल मीडियावर गरोदर पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत अंशुमनने बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर अंशुमन-सिरीयाला नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे ते दोघेही आनंदी आहेत. 

अंशुमनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने "प्रेम आणि शुभेच्छांसाठी आम्ही आभारी आहोत. ही देवाची कृपा आहे आणि आम्ही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो," असं कॅप्शन दिलं आहे. मार्च महिन्यात अंशुमनची पत्नी सिरीया बाळाला जन्म देणार असल्याचंही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अंशुमने २०२२ मध्ये सिरीयाशी अमेरिकेत लग्नगाठ बांधली होती. त्याची पत्नी वीगन शेफ व योगा टीचर आहे. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. अभिनेता असण्याबरोबरच अंशुमन दिग्दर्शक व निर्माताही आहे. त्याने अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. मस्तराम या वेब सीरिजमुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता.  

टॅग्स :सेलिब्रिटीवेबसीरिज