Join us

चित्रपट सुपरहिट! तरीही रणबीरला सतावत होती 'या' गोष्टीची चिंता, सुपरस्टारने दिलेला सल्ला आला कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:28 IST

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूर झालेला निराश; काय होतं नेमकं कारण?

Anil Kapoor On Animal Cinema: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या अभिनयामुळे कायम प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्याने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रणबीर कपूर संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अॅनिमल चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. बाप-लेकाच्या नात्यावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. दरम्यान, या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर त्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र, तुम्हाला माहितीये का हा चित्रपटात काम करण्यापूर्वी रणबीर प्रचंड निराश होता. यामागे काय कारण होतं, याबद्दल अनिल कपूर यांनी खुलासा केला आहे.

अलिकडेच अनिल कपूर यांनी 'FICCI' च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अ‍ॅनिमल चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वीचा एक किस्सा शेअर केला. तो किस्सा सांगताना ते म्हणाले," अॅनिमलच्या शूटिंगवेळी रणबीर सेटवर आला. त्यावेळी तो थोडा निराश होता. तेव्हा तो मला म्हणाला, मी 'शमशेरा' सारखा फ्लॉप चित्रपट दिला आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष माझ्याकडे आहे. त्याला काय म्हणायचं होतं ते मला समजलं, मग मी त्याला म्हणालो, 'असं काही नसतं .उद्या लोकं सगळं विसरतील. फक्त तूच या गोष्टींबद्दल विचार करत आहेस, पण इतर कोणालाही याचं काही पडलेलं नाही. त्यानंतर आम्ही 'अ‍ॅनिमल' चित्रपटाशी संबंधित एक फोटोशूट केलं. "

त्यानंतर ते म्हणाले, "यश आणि अपयश या गोष्टी आपल्या हातात नाही. आपण फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. याचं उदाहरण म्हणजे अॅनिमल सिनेमा आहे. हा चित्रपट हिट झाल्यानंतर समशेरा फ्लॉप झालेला ही गोष्ट सगळेच विसरले. " असं मत अनिल कपूर यांनी मांडलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Animal's success: Ranbir's worries and Anil Kapoor's valuable advice.

Web Summary : Ranbir Kapoor, concerned about past failures before 'Animal,' received encouraging advice from Anil Kapoor. Kapoor emphasized focusing on honest work, leading to 'Animal's' massive success, overshadowing previous setbacks. Kapoor highlighted that success and failure are not in our hands.
टॅग्स :अनिल कपूररणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा