Join us

संपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:02 IST

उर्वशीच्या बोल्ड व्हिडिओची सर्वत्र होतेय चर्चा

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा तिला फोटो व व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यातही ती ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल देखील सुनावते. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील क्वारंटाईनमध्ये आहे. पण तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यात आता तर ती तिच्या हॉट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने ड्रेस काढून बॅकलेस दाखवताना दिसते आहे. तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

या व्हिडिओच्या आधी उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती बिकिनीमध्ये समुद्रात आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हा व्हिडीओ खरं तर खूप जुना आहे.

मात्र उर्वशी सध्या होम क्वारंटाईनच्या काळात तिचे जुने दिवस आठवत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, Me taking bath in quarantine like.

काही दिवसांपूर्वी उर्वशीने आपल्या चाहत्यांना घरात राहून व्यायाम कसा करावा हे तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शिकवण्यास सुरुवात देखील केली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत कसरत आणि स्ट्रेचिंग घरबसल्या कसे करायचे हे सांगितले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून पहिल्याच दिवशी २० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलाकोरोना वायरस बातम्या