Join us

‘बोल्डनेस’चा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 13:37 IST

बॉलिवूडमधील जबरदस्त स्पर्धेमुळे प्रत्येक अभिनेत्री काही तरी वेगळा कारनामा करून स्वत:ची छाप पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणी प्लास्टिक सर्जरी ...

बॉलिवूडमधील जबरदस्त स्पर्धेमुळे प्रत्येक अभिनेत्री काही तरी वेगळा कारनामा करून स्वत:ची छाप पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणी प्लास्टिक सर्जरी तर कोणी अ‍ॅक्टिंगवर मेहनत घेत आहे. मात्र यातील काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्या शॉटकट पद्धतीने स्टारडम मिळवू पाहत आहेत. त्यासाठी त्या बॉलिवूडमधील प्रचलित फॉर्म्युला असलेल्या बिकिनी किंवा बोल्डशॉटचा आधार घेत आहेत. ‘पार्च्ड’ या लघुपटातून चर्चेत आलेल्या राधिका आपटे हिच्या बोल्डशॉटमुळे पुन्हा एकदा ‘बॉलिवूड आणि बोल्डनेस’ हा मुद्या पुढे आला आहे. चित्रपटात राधिकाने दिलेले शॉट अनेकांची बोलती बंद करणारे आहेत. यापूर्वी देखील तिने आपल्या बोल्डनेसने खळबळ उडवून दिली होती. राधिकाप्रमाणे इतरही बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्यांना बोल्डनेस फॉर्म्युला वापरून बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. पूनम पांडेबोल्ड सीन अन् पूनम पांडे याबाबत न बोललेच बरे. कारण पूनमसाठी बोल्ड सीन देणे फार अवघड नाही. ‘नशा’ या चित्रपटासाठी पूनमला जेव्हा न्यूड सीनबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने कुठलाही विचार न करता लगेचच होकार दिला. सध्या पूनमकडे फारसे चित्रपट नसले तरी ती सोशल मीडियामुळे मात्र नेहमीच चर्चेत असते. ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर हॉट फोटो अपलोड करून ती नेहमीच वादाच्या भोवºयात असते. नुकताच तिने ‘डू द रेक्स’ नावाचा व्हिडीओ अपलोड केला असून, त्यात तिने अतिशय वल्गर डांस केला आहे. शर्लिन चोपडाबोल्ड अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून धुम उडवून देणाºया शर्लिन चोपडाने आपल्या बोल्डनेसच्या जोरावर बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही नशिब आजमावले आहे. ‘कामसुत्र-३डी’मध्ये काम करणाºया शर्लिनने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. बॉलिवूडमध्ये बोल्डनेसमुळे धमाकेदार एंट्री करणारी शर्लिन सोशल मीडियावर भरतीच अ‍ॅक्टीव्ह असते. नेहमीच ती बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मल्लिका शेरावतआपल्या पहिल्याच ‘ख्वाईश’ या चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा किसिंग सिन देणाºया मल्लिका शेरावतने देखील बोल्डनेसच्या सर्वच परिसिमा तोडल्या आहेत. त्यानंतर २००४ मध्ये इमरान हाश्मीसोबत तिने ‘मर्डर’ या चित्रपटात बोल्ड सीन देवून खळबळ उडवून दिली होती. पुढे ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये तर ओम पुरी या वरिष्ठ अभिनेत्यासोबत तिने बोल्ड सीन दिले. सध्या मल्लिका बॉलिवूडमधून गायब दिसत असली तरी, प्रेक्षकांना तिच्या अशाच अवतारातील एखाद्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे, हे नक्की. राखी सावंतआयटम गर्ल म्हणून परिचित असलेल्या राखी सावंतने देखील बोल्डनेसच्या जोरावरच बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. बी ग्रेड चित्रपट आणि काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकलेल्या राखी आपल्या बोल्ड व वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. सध्या राखी राजकारणात नशिब आजमावत असून, तिथेही तिचे जलवे भविष्यात वादळ निर्माण करतील यात शंका नाही. पूजा मिश्राचित्रपटांमध्ये फारशी कमाल जरी करता आला नसला तरी, वादग्रस्त कपडे व वक्तव्यांमुळेच अभिनेत्री पूजा मिश्रा अधिक चर्चेत राहिली आहे. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सर्वाधिक वादाच्या भोवºयात राहिलेल्या पूजाला प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत. मध्यंतरी पूजाने ‘पेटा’साठी (पक्षांना वाचविण्याच्या मोहिमेत सहभाग) फोटोशुट करून स्वत:वर कौतुकाचा वर्षाव करून घेतला होता. त्यानंतर तिने स्वत:वर गॅँगरेप झाल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती.