बोल्ड ब्यूटी उर्वशी रौतेलाने बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे फोटो केले शेअर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 18:56 IST
उर्वशी रौतेलाला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. आता तिने असेच काहीसे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.
बोल्ड ब्यूटी उर्वशी रौतेलाने बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे फोटो केले शेअर!!
बॉलिवूडची बोल्ड ब्यूटी उर्वशी रौतेला पुन्हा एकदा आपल्या बोल्ड कारनाम्यामुळे चर्चेत आली आहे. उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असून, ती नेहमीच त्यावर तिचे हॉट व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत असते. यावेळेसही तिने असेच काहीसे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. उर्वशीने यावेळी चक्क बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे. उर्वशीने तिच्या आॅफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे फोटो शेअर केले. फोटोमध्ये ती कॉफी पिताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना उर्वशीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आफ्टर ए लॉँग वीक आॅफ वर्क, आय थिंक आय डिझर्व्ह सम बबल्स. बबल्स बाथ आर माय फेव्हरेट.’ दरम्यान, उर्वशीच्या या फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत आहे. उर्वशीने तिचे हे हॉट फोटो अपलोड करताच यूजर्सकडून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे. एका यूजर्सनी तर तिला सल्ला दिला की, तुझे सौंदर्य पाहता तू ‘हेट स्टोरी-४’सारखा चित्रपट कधीच करू नकोस. दरम्यान, उर्वशीने ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटातही एका गाण्यामध्ये बाथटबमध्ये काही सीन दिले आहेत. सध्या ती ‘भानुप्रिया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातही तिचा असाच काहीसा बोल्ड अंदाज बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती या चित्रपटात काम करणार की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात होती; परंतु आता ती या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट झाले असून, तिने शूटिंगलाही सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, चाहत्यांना तिच्या या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.