बॉडीशेमर्सला जरीनचा टोला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 12:26 IST
जरीन खानला ‘हेट स्टोरी ३’ मुळे नव्या ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ रूपात पहावयास मिळाले. त्यानंतर जरीनची इमेज ही बॉलीवूडमध्ये अतिशय ...
बॉडीशेमर्सला जरीनचा टोला !
जरीन खानला ‘हेट स्टोरी ३’ मुळे नव्या ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ रूपात पहावयास मिळाले. त्यानंतर जरीनची इमेज ही बॉलीवूडमध्ये अतिशय हॉट अशी झाली. तिने ‘वीर’ चित्रपटांतही काम केले. पण, त्यात तिला तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही.हेट स्टोरी ३ साठी तिने वजन खुप कमी केले. तिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती एका ठिकाणी अतिशय जास्त वजन असलेली मुलगी दिसते आहे, तर दुसरीकडे अतिशय हॉट अॅण्ड सेक्सी अशी जरीन दिसते आहे. तिने या फोटोसह पोस्ट केले आहे की,‘ मी या फोटोत स्वत:ला पाहिल्यानंतर मला अभिमानच वाटतो. कुठल्याही वाईट बाबी मला माझ्या वाढत्या वजनामुळे ऐकाव्या लागल्या नाहीत. कारण ते शरीर माझेच होते. त्यासोबत काय करायचे हे मीच ठरवणार होते.त्यामुळे मी ठरवले की, चला थोडंसं लाईट होऊ या...थोडंसं स्लिम होऊन पाहू या. यामुळे माझ्यात झालेला बदल मला आनंद देतो आहे. पण बॉडीशेमर्स यांना मी हा फोटो दाखवू इच्छिते. मी वजन वाढवू शकते तर कमीही करू शकते.’