Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंडित जसराज यांचं पार्थिव अमेरिकेतून मुंबईत दाखल, उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:19 IST

संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर बुधवारी अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले आहे.

 संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर बुधवारी अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले आहे. पंडित जसराज यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहे. विलेपार्लेतील स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. पंडितजींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या वर्सोव्यातील घरात ठेवण्यात आले आहे. 

पंडित जसराज यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याआधी 21 ताफ्यांची सलामी देण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार प्रक्रियेत अनेक मान्यवरही सहभागी होणार आहेत. 

पद्मविभूषण पंडित जसराज हे मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडीत मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थोरले बंधू मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंह वाघेला आणि उस्ताद गुलाम कादरखाँ यांच्याकडून जसराज यांनी गायनाचे उच्च शिक्षण घेतले. आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडूनही त्यांनी धडे गिरवले.शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.पद्मविभूषण पंडित जसराज यांचं नाव मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांदरम्यान असलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहाला 2006मध्ये देण्यात आले आहे. असा सन्मान मिळणारे पंडित जसराज हे एकमेवर भारतीय संगीत कलाकार आहेत.

टॅग्स :संगीत