Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बॉबी देओलच्या हाती लागला एक मोठा अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट! वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:13 IST

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या ‘रेस3’ची चर्चा जोरात सुरु झालीय. ‘रेस3’मध्ये सलमान व जॅकलिन फर्नांडिस ही जोडी तर फायनल ...

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या ‘रेस3’ची चर्चा जोरात सुरु झालीय. ‘रेस3’मध्ये सलमान व जॅकलिन फर्नांडिस ही जोडी तर फायनल झालीय. पण सलमानसोबत दिसणार असलेल्या दुस-या हिरोचे म्हणाल तर या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. पण आता ही चर्चा थांबणार आहे. कारण या भूमिकेसाठी एका अभिनेत्याचे नाव फायनल झाल्याची खबर आहे. हा अभिनेता कोण? तर बॉबी देओल. होय, बॉबीची ‘रेस3’मध्ये वर्णी लागलीय. बॉबीने अनेकांना धूळ चारत ही भूमिका आपल्या झोळीत पाडून घेतलीयं.‘रेस3’चे प्रोड्यूसर रमेश तौरानी यांनी  या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी बॉबीसोबत ‘सोल्जर’ आणि ‘नकाब’मध्ये काम केले आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला आहे. बॉबी अतिशय प्रोफेशनल आहे आणि त्याच्या कामाची हीच पद्धत मला आवडते. ‘रेस3’मध्ये प्रेक्षकांना त्याचे एक वेगळेच रूप पाहायला मिळेल, असे तौरानी यांनी सांगितले. ‘रेस3’मध्ये सगळे कॅरेक्टर ग्रे आहेत. या चित्रपटासाठी अनेक नावांची चर्चा होत आहे. पण अद्याप केवळ तीन नावे फायनल झाली आहेत. उर्वरित स्टारकास्ट लवकरच जाहिर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  ‘रेस3’साठी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता, अशी बातमी मध्यंतरी कानावर आली होती. अर्थात डेट्स मॅच होत नसल्याने अमिताभ यांनी या चित्रपटाला नकार दिल्याचे कळते. पण आता बॉबीचे नाव मात्र फायनल आहे.ALSO READ : बॉबी देओलची लव्ह स्टोरी तुम्हाला ठाऊक आहे?‘बरसात’, ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘बिच्छू’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांचा हा नायक मागच्या दहा वर्षांपासून  कामाच्या शोधात होता. परंतु या काळात त्याला एकही चित्रपट मिळाला नाही.  अशा स्थितीत  बेरोजगार ठरलेल्या बॉबीने   दिल्लीच्या आरएसव्हीपी क्लबमध्ये डीजेचे काम सुरू केल्याची खबर होती. अर्थात बॉबीने ही खबर नाकारली होती. अलीकडे बॉबी ‘पोस्टर ब्वॉईज’मध्ये दिसला होता.