Join us

बॉबी देओलची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 06:00 IST

बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या असून तिच्या सौंदर्याची नेहमीच तारीफ केली जाते.

ठळक मुद्देतान्या ही दिसायला अतिशय सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीइतकीच छान दिसते.

बॉबी देओलचा आज वाढदिवस असून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा तो मुलगा आहे. घरातच फिल्मी वातावरण असल्याने तो खूपच कमी वयात अभिनयक्षेत्राकडे वळला. त्याने धर्मवीर या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तो बालकलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने बरसात या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

बॉबी देओल अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी त्याच्या पत्नीला आपल्याला खूपच कमी वेळा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्याच्यासोबत पाहायला मिळते. बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या असून तिच्या सौंदर्याची नेहमीच तारीफ केली जाते. तान्या ही दिसायला अतिशय सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीइतकीच छान दिसते.

बॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. होय, बॉबी अगदी पहिल्याच नजरेत तान्याच्या प्रेमात पडला होता. बॉबी आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित होता. त्याठिकाणी तान्याही बसलेली होती. बॉबीने जेव्हा तान्याला बघितले तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. पुढे बॉबीने लगेचच तान्याबद्दलची माहिती काढली.

काहीच दिवसांत बॉबी आणि तान्या यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही व्हायला लागल्या. त्यानंतर एकेदिवशी बॉबी तान्याला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, ज्याठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला बघितले होते. तिथेच त्याने तिला प्रपोज केले. पुढे दोघांच्या परिवारातील लोक एकमेकांना भेटले आणि लग्नाची बोलणी केली.

बॉबीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांना तान्या खूपच पसंत पडली. त्यामुळे त्यांनी लगेचच ‘चट मंगनी, पट ब्याह’ उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशापद्धतीने १९९६ मध्ये तान्या आणि बॉबीने साताजन्माच्या गाठी बांधल्या. तान्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यातून आहे. त्यांचा खूप मोठा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा ‘द गुड अर्थ’ या नावाने बिझनेस आहे. तान्या देखील स्वत: एक डिझाईनर आहे.

टॅग्स :बॉबी देओलधमेंद्र