Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बॉबी देओलला करायचे होते 'या' अभिनेत्रीशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 12:10 IST

बॉबी देओलचे तान्या आहुजासोबत लग्न झाले असून तो त्याच्या संसारात खूप खूश आहे. त्यांच्या लग्नाला आता वीस वर्षांहूनही अधिक ...

बॉबी देओलचे तान्या आहुजासोबत लग्न झाले असून तो त्याच्या संसारात खूप खूश आहे. त्यांच्या लग्नाला आता वीस वर्षांहूनही अधिक वर्षं झाले आहेत. त्या दोघांना दोन मुलेदेखील आहेत. बॉबी आज त्याच्या संसारात सुखी असला तरी बॉबीला तान्याशी नव्हे तर बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीशी लग्न करायचे होते हे खूपच कमी जणांना माहिती आहे. या अभिनेत्रीसोबत त्याचे अनेक वर्षं अफेअरदेखील होते. पण वडिलांली लग्नाला केलेल्या विरोधामुळे त्याने माघार घेतली आणि त्या अभिनेत्रीसोबत ब्रेकअप केले. निलम कोठारीने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. तिच्या सुंदरतेमुळे त्या काळात तिला डॉल म्हणूनच ओळखले जात असे. याच निलमच्या सौंदर्याच्या प्रेमात एकेकाळी बॉबी देओल पडला होता. बॉबी आणि निलमचे सिरियस अफेअर होते आणि ते दोघे जवळजवळ पाच वर्षं नात्यात होते. बॉबीला निलमसोबत लग्नदेखील करायचे होते आणि त्याबाबत त्याने त्याचे वडील धर्मेंद्र यांनादेखील सांगितले असल्याचे म्हटले जाते. पण निलम ही त्याकाळात चित्रपटांमध्ये काम करत होती. धर्मेंद्रला कोणतीही अभिनेत्री सून म्हणून मान्य नव्हती आणि त्याचमुळे त्याने या दोघांच्या लग्नाला विरोध केला. धर्मेंद्र लग्नाला तयारच नसल्याने ब्रेकअप करण्याशिवाय बॉबीकडे कोणताच पर्याय नव्हता. याच कारणामुळे निलम आणि बॉबी यांच्यात दुरावा निर्माण झाला. या नात्यातून बाहेर पडल्यानंतर बॉबी आणि निलम दोघेही आपल्या आयुष्यात सेटल झाले. निलमने व्यवसायिक रिषी सेठियासोबत लग्न केले. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी निलमने अभिनेता समीर सोनीसोबत संसार थाटला.