Join us

नव्या वर्षात बॉबी देओलला लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 17:09 IST

उप्पर वाला जभी देता देता छप्पर फाडके अशी काहीशी अवस्था सध्या बॉबी देओलची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पडद्यापासून ...

उप्पर वाला जभी देता देता छप्पर फाडके अशी काहीशी अवस्था सध्या बॉबी देओलची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पडद्यापासून लांब असलेल्या बॉबीला 2018मध्ये चित्रपटांची लॉटरी लागली आहे. 2017मध्ये चार वर्षानंतर बॉबी देओलचा पोस्टर ब्वॉयज रिलीज झाला होता. या चित्रपटात बॉबी आपला भाऊ सनी देओल आणि श्रेय तळपदे बरोबर दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकला नाही मात्र बॉबीची किस्मत मात्र चमकली. यानंतर बॉबीला एक बिग बजेटची चित्रपटाची ऑफर मिळाली होती. सलमान खानने आपल्या आगामी चित्रपट 'रेस3'साठी बॉबीला साईन केले. रेस 3 शिवाय बॉबी यमला पगला दिवाना 3 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात बॉबी देओल वडिल धर्मेंद आणि भाऊ सनी देओलसोबत मिळून प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. यमला पगला दिवाना सिरीजचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर या आधी रिलीज झाले आहेत. या दोनही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. याशिवाय रेस सिरीजचे चित्रपट ही हिट गेले आहेत. आशा केली जाते आहे की बॉबीचे येणारे दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट जातील. या दोनही चित्रपटांसाठी बॉबीला चांगले मानधन देण्यात आल्याचे ही कळतेय.  ALSO RAED :  ‘त्या’ चार महिलांमुळे रात्रभर झोपला नाही बॉबी देओल, वाचा काय आहे प्रकरण!काही दिवसांपूर्वी अचानक धर्मेंद यांना भेटायला  सलमान खानला गेला होता. त्यादरम्यानचा फोटो धर्मेंद यांनी स्वत: ट्विटरवर शेअर केला होता.  हा फोटो शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन सुद्धा दिले होते. अतिशय भावनिक अशा शब्दांचा त्यांनी वापर केला. त्यांनी लिहिले की, फार्मवर तू अचानकच भेटीसाठी आल्यामुळे मी खूप भावनाविवश झालो... तू नेहमीच माझ्या मुलाप्रमाणे राहिला आहेस... सलमान खान. धर्मेंद यांच्या मुलाला म्हणजे बॉबीला सलमानने रेस 3 मध्ये काम दिल्याने ती खूष असल्याची चर्चा आहे. बॉबीच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट खूपच महत्त्वपूर्ण समजला जात आहे. रेस3 मध्ये सलमान, बॉबीशिवाय अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, शाकिब सलीम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.