Join us

फ्लॉप अभिनेता म्हणून हिणवल्या जाणाऱ्या बॉबी देओलला आश्रमसाठी मिळाला पुरस्कार, या व्यक्तीला दिले यशाचे श्रेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 17:42 IST

आश्रम या वेबसिरिजचे आतापर्यंत दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हे दोन्ही सिझन प्रचंड गाजले.

ठळक मुद्देदादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड हा अतिशय महत्त्त्वाचा अवॉर्ड मानला जातो. हा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, हा क्षण मी माझ्या आईसोबत साजरा करत आहे.

बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या आश्रम या वेबसरिजची चांगलीच चर्चा रंगली होती. बॉबी या वेबसिरिजमध्ये एका बाबाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक झाले होते आणि आता त्याला या भूमिकेसाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड मिळाला आहे. सोशल मीडियावर आईसोबतचा एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी त्याने आपल्या चाहत्यांना दिली आहे. या पुरस्काराचं श्रेय त्याने आपल्या आईला दिलं आहे.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड हा अतिशय महत्त्त्वाचा अवॉर्ड मानला जातो. हा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, हा क्षण मी माझ्या आईसोबत साजरा करत आहे. बॉबीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या पोस्टवर एक लाख 20 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सामान्यांसोबत सेलिब्रेटीदेखील फोटोवर कमेंट करत त्याला त्याच्या या यशासाठी शुभेच्छा देत आहेत. 

आश्रम' ही वेबसीरीज एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली होती. यात आश्रमात महिलांना होणारा छळ दाखवण्यात आला होता. तसेच एक बाबा सामान्य लोकांच्या श्रद्धेचा कसा गैरवापर करतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. 

आश्रम या वेबसिरिजचे आतापर्यंत दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हे दोन्ही सिझन प्रचंड गाजले. 'आश्रम' वेबसीरिजचा पहिला सीझन रिलीज झाला होता तेव्हा निर्माते आणि कलाकारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. वेबसीरिजचा बॉबी देओल आणि निर्माता प्रकाश झा यांनी सर्व आरोप सरसकट फेटाळले होते.

टॅग्स :बॉबी देओलआश्रम चॅप्टर २