Join us

जेव्हा करिनाने लगावली होती बिपाशाच्या कानशिलात... वाचा काय होते प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:11 IST

आजही हा किस्सा बॉलिवूडमध्ये ऐकवला जातो.

ठळक मुद्दे करिनाचे वागणे बालिश होते. मी पुन्हा कधीही तिच्यासोबत काम करणार नाही, असे बिपाशा एका मुलाखतीत म्हणाली होती. 

एका रात्रीत स्टार झालेले आणि पुढे अचानक फ्लॉपचा शिक्का माथी घेऊन फिरणारे अनेकजण बॉलिवूडमध्ये आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. या अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि बघता बघता ती बॉलिवूडची आघाडीची नायिका बनली. पण पुढे अचानक बॉलिवूडमधून बाद झाली. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याबद्दल.

बिपाशाने 2001 मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात बिपाशासह करिना कपूर लीड रोलमध्ये होती. पण या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशाला करिनाचा मार खावा लागला होता. आजही हा किस्सा बॉलिवूडमध्ये ऐकवला जातो.

होय,  चित्रपटात करिना आणि बिपाशा बासू या दोघींच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र करिनाच्या तुलनेत बिपाशाला अधिक प्रसिद्धी मिळत गेली. चित्रपटात बिपाशाने जोरदार अंगप्रदर्शन केल्याने तिची जाम चर्चा होती. नेमकी हीच बाब करिनाला खटकली.  टीव्ही, वृत्तपत्र, साप्ताहिक सगळीकडेच बिपाशाचा डंका वाजत होता. मात्र बिपाशाची ही प्रसिद्धी करिनाला पचविणे अवघड झाले होते. मग काय, बिपाशाला टोमणा मारण्याची एकही संधी करिना सोडत नव्हती. 

अशात करिनाचा डिजाईनर विक्रम फडणीसने बिपाशाची मदत केली. मग काय करिनाचा पारा आणखीच भडकला.एक दिवस बिपाशानेही करिनाला जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले. तसे तिने धाडसही केले. परंतु यावेळेस करिनाच बिपाशावर भारी पडली. करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिनाचा राग बॉबीवरही बरसला. त्यालाही तिने सुनावले. 

बिपाशा एका मुलाखतीत यावर बोलली होती. करिनाचे वागणे बालिश होते. मी पुन्हा कधीही तिच्यासोबत काम करणार नाही, असे बिपाशा म्हणाली होती. यानंतर करिनानेही यावर बोलली होती. माझ्या मते, बिपाशाला तिच्या टॅलेंटवर अजिबात विश्वास नाही. चार पानांच्या मुलाखतीत तीन पेज ती फक्त माझ्यावर बोलली. बिपाशाला जी काही प्रसिद्धी मिळाली ती तिच्या व माझ्या भांडणामुळे मिळाली, असे करिना म्हणाली होती.

टॅग्स :बिपाशा बासूकरिना कपूर