birthday special: ‘शोले’तील गब्बरची भूमिका मिळवण्यासाठी अमजद खान यांनी केले होते असे काही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 11:55 IST
‘शोले’ या अजरामर चित्रपटातील गब्बर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. होय, गब्बर सिंगच्या तोंडचे संवाद तुफान गाजले होते. अभिनेते ...
birthday special: ‘शोले’तील गब्बरची भूमिका मिळवण्यासाठी अमजद खान यांनी केले होते असे काही!
‘शोले’ या अजरामर चित्रपटातील गब्बर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. होय, गब्बर सिंगच्या तोंडचे संवाद तुफान गाजले होते. अभिनेते अमजद खान यांनी ही भूमिका अजरामर केली होती. आज अमजद खान आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक चित्रपट, त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतील. त्यांनी अनेक भूमिका केल्यात. पण ‘शोले’नंतर गब्बर सिंग याच भूमिकेने ते सगळ्यांच्या लक्षात राहिले. अमजद खान यांचा आज (१२ नोव्हेंबर) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊ यात, त्यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी... अमजद खान यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४९ रोजी हैदराबादमध्ये झाला होता. ते अभिनेते जयंत यांचे पुत्र होते. वांद्रा येथील सेंट टेरेसा स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर अमजद यांनी आर. डी. नॅशनल कॉलेजमधून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारे अमजद बालकलाकार म्हणून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले होते. १९५७ साली रिलीज झालेल्या ‘अब दिल्ली दूर नहीं’ या सिनेमाते बालकलाकार म्हणून दिसले होते. यानंतर १९७३ साली आलेल्या ‘हिंदूस्तान की कसम’ या सिनेमात ते नायक म्हणून झळकले होते. १९७५ साली रिलीज झालेल्या ‘शोले’ या सिनेमात त्यांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली होती.‘शोले’नंतर अमजद खान अनेक सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत झळकले. ‘शोले’मधील भूमिका मिळवण्यासाठी अमजद यांनी बरेच काही केले होते, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. ‘शोले’साठी रमेश सिप्पी यांना पडद्यावर भयावह दिसेल, अशा अभिनेत्याचा शोध होता. त्यांची पहिली पसंत डॅनी होते. पण डॅनीकडे तारख्या नव्हत्या. खरे तर संजीव कुमारही गब्बरच्या भूमिकेत इंटरेस्टेड होते. पण संजीव कुमारला या भूमिकेसाठी घेतले असते तर ठाकूर साहबची भूमिका कुणी केली असती? अशातच एकेदिवशी मेहमूद यांनी सिप्पींची अमजद खान यांच्याशी ओळख करून दिली. पण अमजद खान सिप्पी यांना कुठल्याही अँगलने गब्बरच्या भूमिकेसाठी ‘फिट’ वाटत नव्हते. इंग्रजांसारखा दिसणारा हा सुंदर चेहरा या भूमिकेसाठी योग्य नाही, असे सिप्पींचे मत होते. मग काय? अमजद खान जसे आलेच तसेच सिप्पींच्या कार्यालयातून निघून गेलेत. दुसºया दिवशी सिप्पी आपल्याच कार्यालयात संजीव कुमार व मेहमूद यांच्याशी ‘शोले’वर चर्चा करत होते. अचानक एक भयावह दिसणारी व्यक्ती बळजबरीने सिप्पींच्या कार्यालयात शिरली. मळलेले कपडे आणि हातात बंदूक़ त्या व्यक्तीने रमेश सिप्पींना बंदी बनवले आणि त्यांना धमकावून लागली. सगळेच घाबरले. सिप्पी तर ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून सिक्युरिटी धावून आली आणि त्यांनी त्या व्यक्तीला पकडले. सिप्पींनी लगेच पोलिसांना फोन करण्यासाठी रिसीव्हर उचलला. तितक्यात ती व्यक्ती जोराने ओरडली. सर, मी कुणी दरोडेखोर नाही,तर अमजद खान आहे. गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी आलेला अमजद खान. मग काय, सिप्पींनी लगेच हा रोल अमजद खान यांना दिला. विशेष म्हणजे, अमजद खान यांच्या या कटात स्वत: मेहमूद आणि संजीव कुमारही सामील होते.अमजद खान यांनी १९७२ मध्ये शीला खान यांच्याबरोबर लग्न केले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचा थोरला मुलगा शादाब खानने काही चित्रपटांत अभिनय केला आहे. ALSO READ: ‘शोले’च्या शूटिंगवेळी चहा मिळाला नसल्याने गब्बर अमजद खानने सेटवर आणल्या होत्या चक्क दोन म्हशी!१९८७ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरअमजद खान यांना अपघात झाला होता. या अपघातानंतरच्या औषधांमुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढले होते. अमजद खान चहाचे शौकिन होते. ते दिवसाला २५ ते ३० कप चहा घ्यायचे. २२ जुलै १९९२ रोजी या दिवशी वयाच्या ५१या वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यामुळे अमजद खान यांची प्राणज्योत मालवली.