Join us

Birthday special : स्मिता यांचा वृत्‍तनिवेदिका ते अभिनेत्रीपर्यंत थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:06 IST

स्मिता पाटील हे चित्रपटसृष्टीतील पडलेले एक सुंदर स्वप्न.17 ऑक्टोबर 1955 साली निखळ सौंदर्याची खाण असलेल्या स्मिता पाटील यांचा जन्म ...

स्मिता पाटील हे चित्रपटसृष्टीतील पडलेले एक सुंदर स्वप्न.17 ऑक्टोबर 1955 साली निखळ सौंदर्याची खाण असलेल्या स्मिता पाटील यांचा जन्म झाला. भले ही त्यांची चित्रपटातीलसृष्टीतील कारकीर्द फक्त 10 वर्षांची राहिली मात्र आजही त्या प्रत्येकांच्या मनात कायम आहेत. स्मिता पाटील केवळ चित्रपटातील अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही तेवढाच चर्चेत राहिल्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते.  दूरदर्शनवर एका सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्माला आलेल्या स्मिता पाटील यांच्यावरही बालपणापासूनसमाजकारणाचे धडे कोरले गेले. वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे.  श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले. स्मिता पाटील यांच्यातली अभिनय क्षमता ओळखून श्याम बेनेगल यांनी 'चरणदास चोर' या सिनेमात पहिला ब्रेक दिला. आपल्या पहिल्यात चित्रपटातून स्मिता यांनी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यांच्या अभिनयाची दखल सगळ्यांनाच घ्यायला त्यांनी भाग पाडले. 'चरणदास चोर'नंतर त्यांनी आयुष्यात कधी मागे वळून पाहिलेच नाही. स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक चित्रपटातही यश संपादन केले. 70 ते 80 चे दशक जणू स्मिता यांचेच होते. हिंदी आणि मराठी या दोन्हींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला. जैत रे जैत या चित्रपटातील त्यांनी केलेल्या अभिनयाला तोड नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय चित्रपटातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले होते. 1985 साली त्यांनी राज बब्बर यांच्याशी विवाह केला.  जेव्हा स्मिता पाटील यांनी घरात लग्नाचा विषय काढला  तेव्हा राज यांना चांगलाच विरोध झाला. घर अथवा स्मिता पाटील याच्यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. त्यांचा नादिया बब्बर यांच्याशी विवाह झाला होता. राज आणि नादिया यांची दोन मुलेही आहेत. पण राज यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.  ALSO READ :   प्रतिक हरवला आईच्या आठवणीतस्मिता पाटील यांनी प्रतीक नावाच्या गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर काही तसातच स्मिता यांच्या प्रकृती खालवली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतीकने जन्म घेऊन केवळ सहाच तास झाले होते. तोच स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. स्मिता यांची अकाली एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. त्यांच्या निधनानंतरही त्या चित्रपटाच्यारुपात आजही कायम आहे.