Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ, वडिलही आहेत प्रसिद्ध उद्योगपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 10:57 IST

शर्वरी राजकीय कुटुंबातील आहे. शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.

14 जून 1997 रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूल आणि मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये शिकलेली शर्वरी राजकीय कुटुंबातील आहे.  शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तिच्या आजोबांचा राजकारणात चांगलाच दबदबा आहे.

 शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.  तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे.शर्वरीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. शर्वरीने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओमधून अभिनयाचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसंच बॉलिवूडमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.

प्यार का पंचनामा २, बाजीराव मस्तानी, सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमांसाठी शर्वरीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'बंटी और बबली २' या चित्रपटातून शर्वरीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात ती सोनिया बबली रावतच्या भूमिकेत दिसली होती. 'द फरगॉटन आर्मी' या वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. शर्वरी लवकरच सितारा के तारे या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

टॅग्स :सेलिब्रिटी