Join us

Neetu Kapoor: स्वत:च्याच लग्नात बेशुद्ध पडल्या होत्या नीतू कपूर, तर ऋषी कपूर यांची झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 09:17 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू कपूर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 8 जुलै 1958 रोजी दिल्लीत शिख कुटुंबात नीतू यांचा जन्म झाला होता. ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) नेहमीच बॉलिवूडच्या एव्हरग्रीन कपलमध्ये राहतील.  नीतू सिंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांची लव्ह स्टोरी सांगणार आहोत.

दिवंगत वडील अभिनेते ऋषी कपूर यांनी 'बॉबी' सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमानंतर ते रातोरात स्टार बनले होते. त्यावेळी तरूणींमध्ये ऋषी कपूर यांची मोठी क्रेझ बघायला मिळत होती. पण ऋषी कपूर हे नीतू कपूरच्या प्रेमात पडले होते. दोघांनी जेव्हा डेटिंग सुरू केलं तेव्हा ऋषी कपूर एक यशस्वी अभिनेते होते. दोघांची पडद्यावरील आणि रिअल लाइफमधील केमिस्ट्री सर्वांना आवडत होती. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न केलं.

कपूर खानदानातील या लग्नात देशासोबतच परदेशातीलही अनेक मान्यवर आले होते. पण यादरम्यान असं काही झालं की, सगळे घाबरले होते. एका मुलाखतीत नीतू कपूर  यांनी सांगितलं होतं की, लग्नादरम्यान ऋषी कपूर आणि त्या स्वत: बेशुद्ध झाल्या होत्या. दोघांचंही बेशुद्ध पडण्याचं कारण वेगवेगळं होतं.

नीतू कपूर यांनी सांगितलं होतं की, मी आणि ऋषी कपूर आमच्या लग्नात बेशुद्ध झालो होतो. माझा लेहंगा फार हेवी होता आणि लग्नात खूप जास्त लोकही आले होते. माझ्यासाठी हे सगळं हॅंडल करणं फार अवघड होतं. माझे पती ऋषी कपूर लोकांची गर्दी पाहून बेशुद्ध पडले होते. ऋषी कपूर घोडीवर बसण्याआधीच बेशुद्ध झाले होते. नंतर आम्ही दोघेही ठीक झालो. तेव्हा आमचं लग्न झालं.

 

टॅग्स :नितू सिंग