Birthday Special : लीजा हेडनने आपल्या बोल्डनेसने लावली बॉलिवूडमध्ये आग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 14:25 IST
आज बॉलिवूडची हॉट अभिनेत्री लीजा हेडन ही तिचा ३१ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. वास्तविक लीजाची पर्सनालिटी बघून कोणालाही ...
Birthday Special : लीजा हेडनने आपल्या बोल्डनेसने लावली बॉलिवूडमध्ये आग!
आज बॉलिवूडची हॉट अभिनेत्री लीजा हेडन ही तिचा ३१ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. वास्तविक लीजाची पर्सनालिटी बघून कोणालाही विश्वास होणार नाही की, तिने तिशी पार केली आहे. ‘ऐ दिल हैं मुश्किल’, ‘हाउसफुल-३’ आणि ‘क्वीन’सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली लीजा तिच्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच लीजाने एका गोंस मुलाला जन्म दिला होता. तत्पूर्वी ती ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटात झळकली होती. लीजाला तिच्या वाढदिवसानिमित्त ‘सीएनएक्स मस्ती’कडून भरपूर शुभेच्छा! जर तुम्हाला आठवत असेल तर गेल्यावर्षी लीजाने खूपच हॉट फोटोशूट केले होते. जेव्हा तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते तेव्हा नेटिझन्समध्ये एकच चर्चा रंगली होती. या फोटोमध्ये ती अभिनेता हृतिक रोशन याच्याबरोबर बघावयास मिळाली होती. दोघांच्या या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली होती. कारण काहीच दिवसांमध्ये हृतिक आणि लीजाचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्या मोबाइल गॅलरीत सेव्ह झाले होते. या फोटोंवरून असाही अंदाज बांधला जात होता की, लवकरच हे दोघे एखाद्या चित्रपटात झळकतील. परंतु अद्यापपर्यंत तशी कुठलीही बातमी समोर आली नाही. असो आज तिच्या वाढदिवसानिमित्त हेच फोटो आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना दाखविणार आहोत. जर लीजा हेडन हिच्याविषयी सांगायचे झाल्यास तिने कोट्यवधी लोकांची मने तोडत बॉयफ्रेंड डीनो लालवाणी याच्याशी गेल्या आॅक्टोबर महिन्यात लग्न केले होते. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्मही दिला. लीजा वेळोवेळी तिच्या चिमुकल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असते. तिच्या चाहत्यांकडून यास चांगला रिस्पॉँसही मिळत असतो.