Birthday special : 'या' कारणामुळे कधी डिप्रेशनमध्ये गेला होता कैलाश खेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 12:28 IST
सुफी गायक कैलाश खेर याचा आज वाढदिवस आहे. कैलाशने आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांची मनं जिंकली आहेत. कैलाश खेरने वयाच्या ...
Birthday special : 'या' कारणामुळे कधी डिप्रेशनमध्ये गेला होता कैलाश खेर
सुफी गायक कैलाश खेर याचा आज वाढदिवस आहे. कैलाशने आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांची मनं जिंकली आहेत. कैलाश खेरने वयाच्या चौथ्या वर्षांपासून गाण्याला सुरुवात केली. आज बॉलिवूडला अनेक हिट गाणी त्यांने दिली आहे. उत्तरप्रदेश मधल्या मेरठमध्ये जन्मलेल्या कैलाश खेरने वयाच्या 13 व्या वर्षी आपले घर सोडले होते आणि तिथूनच त्याच्या संघर्षाची कहानी सुरु झाली.1999 हे वर्ष कैलाशसाठी अंधारामय ठरले. निराश झालेल्या कैलाशने मित्रासोबत बिझनेस सुरु केला होता. मात्र या बिजनेसमध्ये त्याचे प्रचंड नुकसान झाले आणि हा धक्का पचवू न शकल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यादरम्यान त्यांने आत्महत्येचा विचारदेखील केला होता. 2001मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये डीग्री घेतल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईत आल्यावरसुद्धा त्याचा संघर्ष सुरुच होता. एकदिवस त्याची ओळख संगीतकार राम संपत याच्याबरोबर झाली. राम संपतने कैलाश खेरला रेडिओवर जिंगल गाण्याची संधी दिली आणि या संधीचे सोनं कैलाशने केले. यानंतर जिंगलस्ची लाईन कैलाशकडे लागली. आजपर्यंत कैलाशने हिंदीत 500 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांने अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा प्लेबॅक केले आहे. पाली, तमिल, तेलुगू, मलयालम, कन्नड, बंगाली, उडियामध्ये सुद्धा त्यांने पार्श्वगायने केले आहे. 'तेरी दिवानी' हे गाणं त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरले. अल्लाह के बंदे हे गाणे ही त्याचे लोकप्रिय झाले.आजही या गाण्यानं रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. कैलाशला दोन वेळा फिल्मफेयरकडून बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अॅवॉर्ड ही मिळाला आहे.पद्मश्री किताब ही त्याला देण्यात आला आहे. कैलाशचा 'कैलाश' नावाचा बँड आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल शोज करतो.