Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : ​ईशा गुप्ताने बॉलिवूडसाठी धुडकावून लावली ब्रिटीश विद्यापीठाची आॅफर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 10:59 IST

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा आज (२८ नोव्हेंबर) वाढदिवस. ईशाला बॉलिवूडची सेनसेशनल अ‍ॅक्ट्रेस म्हटले जाते. सोशल मीडियावर कमालीची सक्रीय ...

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा आज (२८ नोव्हेंबर) वाढदिवस. ईशाला बॉलिवूडची सेनसेशनल अ‍ॅक्ट्रेस म्हटले जाते. सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेली ईशा कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. २८ नोव्हेंबर १९८५ मध्ये जन्मलेल्या ईशाने मॉस कॉममध्ये पदवी घेतली आहे. पण सुरुवातीपासून मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे तिचे स्वप्न होते.ईशा अभ्यासात हुशार होती. ब्रिटनच्या न्यूकास्ल विद्यापीठाने तिला  स्कॉलरशिप देऊ केली होती. पण ईशाने बॉलिवूडच्या प्रेमाखातरही ही आॅफर धुडकावून लावली होती.ईशा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा वादात सापडली आहे. अनेकांनी तिला तिच्या सावळ्या रंगावरून लक्ष्य केले आहे. पण ईशाला याची पर्वा नाही. मला माझ्या रंगावरून लहानपणापासून अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागल्या आहेत. पण मी कधीही असल्या कमेंट्सची पर्वा केली नाही, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.काही दिवसांपूर्वी ईशा तिच्या टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आली होती. यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले गेले होते. यानंतर आक्षेपार्ह कमेंट्स टाळण्यासाठी ईशाने कमेंट सेक्शन ब्लॉक करून टाकले होते.अलीकडे ईशाचा ‘बादशाहो’ रिलीज झाला होता. आत्तापर्यंत ईशाने एकूण ११ चित्रपटांत काम केले आहे. यात ९ हिंदी चित्रपट आहेत. याशिवाय टीव्ही शो सीआयडीमध्येही ती दिसली आहे.ALSO READ : ईशा गुप्ताने केले पुन्हा हॉट फोटोशूट, पहा फोटो!‘राज3’मध्ये ईशाने एक न्यूड सीन दिला होता. या सीनमुळे ती चर्चेत आली होती. या एका सीनने तिची इमेज बदलली होती. सन २०१२ मध्ये ‘जन्नत2’ द्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशाला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते.२००७ मध्ये ईशा फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने ‘मोस्ट फोटोजेनिक’ किताब जिंकला होता.