Join us

Birthday special: ​‘बबली गर्ल’ आलिया भट्टने असा मिळवला होता पहिला चित्रपट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 10:32 IST

बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिचा आज (१५ मार्च) हा वाढदिवस. यंदा २४ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या आलियाबद्दल जाणून घेऊ यात, काही माहित नसलेल्या गोष्टी...

बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिचा आज (१५ मार्च) हा वाढदिवस. १९९३ मध्ये जन्मलेल्या आलियाने उण्यापुºया सहा वर्षांच्या करिअरमध्ये बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया ओळखली जाते. यंदा २४ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या आलियाबद्दल जाणून घेऊ यात, काही माहित नसलेल्या गोष्टी...आलिया अर्धी काश्मिरी आणि अर्धी जर्मन आहे, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. कसे? तर  आलियाची आई सोनी राजदान या सुद्धा अर्ध्या  कश्मिरी आणि अर्र्ध्या जर्मन आहेत. सोनी राजदान यांचे वडिल जर्मन होते तर आई काश्मिरी होती.आलियाला एक सख्खी बहीण आहे. तिचे नाव शाहीन भट्ट. आलियाला दोन सात्र बहीण भाऊ-बहीणही आहेत. अभिनेत्री पूजा भट्ट आणि राहुल भट्ट हे दोघेही आलियाचे सावत्र भाऊ-बहीण आहेत.  आलियाकडे भारताचे नागरिकत्व नाहीय. आलियाच्या आईचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. सोनी राजदान यांच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे. त्यामुळे आलियाकडेही ब्रिटीश पासपोर्ट आणि तेथील नागरिकत्व आहे. याच कारणामुळे सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलिया मतदान करू शकली नव्हती.आलियाने मुंबईच्या जमनाबाई नर्सी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अ‍ॅक्टिंगशिवाय आलियाला चारकोल पेन्टिंग बनवण्याचा छंद आहे. उणीपुरी चार वर्षांची असताना आलियाने श्यामक डावरच्या डान्स स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले होते.आलियाने १९९९ मध्ये आलेल्या ‘संघर्ष’ या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लहानपणीची व्यक्तिरेखा साकारली होती.पिता महेश भट्ट यांनी आपल्याला लॉन्च करावे, असे आलियाला वाटत नव्हते. त्यामुळे तिने अन्य मुलींप्रमाणे तब्बल ५०० मुलींसोबत करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’साठी आॅडिशन दिले होते. करणने वजन कमी करण्याच्या अटीवर आलियाला सिलेक्ट केले होते. यानंतर  केवळ तीन महिन्यांत आलियाने १६ किलो वजन कमी केले  होते.सन २०१२ मध्ये आलेला आलियाचा ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’ सुपरहिट ठरला. यानंतर आलियाने कधीच मागे वळून पाहिले नाही. नुकताच प्रदर्शित झालेला बद्रीनाथ की दुल्हनिया, डिअर जिंदगी, उडता पंजाब, हायवे, कपूर अ‍ॅण्ड सन्स आदी सिनेमातील आलियाचा अभिनय चांगलाच वाखाणल्या गेला.