Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिशा पटानीने हे ट्वीट करत दिल्या आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 17:49 IST

आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून अनेकजण त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.

ठळक मुद्देदिशाने ट्वीट करत लिहिले आहे की, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे... असाच चमकत राहा आणि अशीच शानदार प्रगती करत राहा...

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सोशल मीडियाद्वारे अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आदित्य ठाकरेंची मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा पटानीने देखील सोशल मीडियाद्वारे आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आदित्य यांच्यासाठी एक ट्वीट केले आहे.

दिशाने ट्वीट करत लिहिले आहे की, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे... असाच चमकत राहा आणि अशीच शानदार प्रगती करत राहा... दिशाच्या या ट्वीटला अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी या ट्वीटवर रिप्लाय करत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असून त्यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते. विशेष म्हणजे दिशा आणि आदित्य यांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी असतो. दिशाचा देखील आजच वाढदिवस आहे.

धोनी या चित्रपटातील दिशाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती. ती नुकतीच मलंग या चित्रपटात दिसली होती. आता सलमान खानच्या राधे या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :दिशा पाटनीआदित्य ठाकरे