Join us

बर्थडे बॅश: सलमान खान केक कापताना ‘ही’ होती त्याच्या जवळ?; पाहा पार्टीचे इनसाईड फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 11:26 IST

सलमान खान म्हणजे बॉलीवूडचे खणखण करणारे सोन्याचे नाणे आहे. ‘भाईजान’च्या परीसस्पर्शाने चित्रपट बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घातल्याशिवाय राहत नाही. वादविवादात ...

सलमान खान म्हणजे बॉलीवूडचे खणखण करणारे सोन्याचे नाणे आहे. ‘भाईजान’च्या परीसस्पर्शाने चित्रपट बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घातल्याशिवाय राहत नाही. वादविवादात अडकूनसुद्धा हरफनमौला सलमानची क्रेझ काही कमी होत नाही. अशा या सुपरस्टारचा आज ५१ वा वाढदिवस.सोमवारी रात्रीपासूनच त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर पार्टीला सुरूवात झाली. यामध्ये केवळ नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना निमंत्रित करण्यात आले. सहसा अत्यंत खासगीपणात वाढदिवस साजरा करणाऱ्या सलमानने यंदा मात्र त्याचा बर्थडे कसा साजरा होतो याची झलक चाहत्यांना दाखवली.भाचा (बहीण अर्पिताचा मुलगा) अहिलसोबत त्याने ‘बिर्इंग ह्युमन’ असे लिहिलेला केक कापला. यावेळी त्याच्या शेजारी उभी असणारी ‘कथित’ गर्लफ्रेंउ युलिया वेंटूर सलमानच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण कॅ मेऱ्यात टिपत होती. तिने नुकतेच म्हटले होते की, ‘सलमानच्या वाढदिवसाल मी हजर राहणार असून त्याद्वारे त्याच्या प्रती असलेला आदर मी प्रकट करणार आहे.’                                                        हॅपी बर्थ डे टू यू : भाच्यासोबत केक कापताना सलमान. सोबत अर्पिताचा पती आयुष शर्मा.                                                        फोटो मोमेंट : युलिया वेंटूर कॅमेºयात हा क्षण टिपताना. सलमान आणि त्याचे कुटुंब - आई, वडील, सोहेल, अरबाज, अलविरा, अर्पिता, सलमानचे पुतणे, आयुष शर्मा - आधीच फार्महाऊसवर पोहचलेले होते. पार्टीला सुशांत सिंग राजपूत, प्रिती झिंटा, इशा गुप्ता, बिपाशा बसू, करण सिंग ग्रोव्हर, बिना काक, कृष्णा अभिषेक, झरीन खान, डिनो मोरिआ, नील नितीन मुकेश, रेमो डीसूजा, संगीता बिजलानी, डेझी शहा आणि पुलकित सम्राट अशा सेलिब्रेटींनी हजेरी लावली.ही पार्टी अशीच न्यू इयरपर्यंत सुरू राहणार असल्याचे कळतेय. सलमानचा बॉडीगार्ड शेराने सांगितले की, ‘केवळ अत्यंत जवळच्या लोकांसाठी ही पार्टी असून यंदा सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.’          हे वर्ष सलमानसाठी खूप यशस्वी ठरले. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी ‘सुल्तान’ला स्वीकृती दिली. सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत त्याने शाहरुख खान आणि अक्षय कुमारला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. तसेच आमिर व शाहरुखसोबतचे ताणलेले संबंधही सुधारले.सलमान पुढच्या वर्षी ईदला कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’मध्ये दिसणार असून त्यानंतर तो ‘टायगर जिंदा है’ आणि ‘दबंग ३’ वर काम सुरू करणार आहे. प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करीत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून ‘सीएनएक्स मस्ती’तर्फे सलमान खानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!पार्टीला पोहचलेले स्टार्स :