Join us
Daily Top 2Weekly Top 5

करणसाठी बिप्सचे ‘स्वीट’ सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 21:23 IST

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी कधीच त्यांची रिलेशनशिप सर्वांसमोर मान्य केली नाही. 

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी कधीच त्यांची रिलेशनशिप सर्वांसमोर मान्य केली नाही. पण, ते त्यांच्या रोमान्सविषयी सातत्याने काही ना काही अपडेट्स देतच असतात. नुकताच करण सिंगचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी बिप्सने म्हणे अनेक केक त्याच्यासाठी आणले होते. त्यावर ‘मंकी’ असे लिहिले होते. गंमत अशीही आहे की, बिप्सच्या बर्थडे लाही करणसिंग ग्रोव्हरने असाच एक केक त्यावर ‘मंकी’ असे लिहून आणला होता. खरंतर यात काय जोक आहे असे आपल्याला वाटू शकते. तिने इन्स्ट्राग्रामवर त्यांच्या सेलिब्रेशनचा फोटो अपलोड केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ हॅप्पी बर्थडे अ‍ॅट करणसिंग ! हॅपीनेस हॅपीनेस अ‍ॅण्ड मोअर हॅपीनेस फॉर यू फ ॉरेव्हर. स्टे द वे यू आर : लव्ह लव्ह लव्ह...’