Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बिप्सची लग्नानंतरची पहिली दुर्गापूजा कोलकात्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 14:36 IST

          अभिनेत्री बिपाशा बसू हिची पती करण सिंह ग्रोवरसोबत लग्नानंतरची यंदाची पहिली दुर्गा पूजा आहे. ...

 

         अभिनेत्री बिपाशा बसू हिची पती करण सिंह ग्रोवरसोबत लग्नानंतरची यंदाची पहिली दुर्गा पूजा आहे. ही दुर्गापूजा अविस्मरणीय व्हावी, यासाठी बिप्सने म्हणे मोठे प्लॅनिंग केले आहे. खुद्द बिप्सनेच हा प्लान उघड केला. कोलकाता हे बिप्सचे माहेरघर. त्यामुळे दुर्गा पूजेसाठी बिपाशा करणसोबत कोलकात्याला जाणार आहे. नवमीला बिप्स दुर्गापूजेत भाग घेईल. यावेळी पारंपरिक खाद्यपदार्थांवर ताव मारण्यास आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यास बिपाशा अतिशय उत्सूक आहे. माझ्यासोबत करणही दुर्गापूजेत सहभागी होणार आहे. कोलकात्यातील दुर्गा पूजेचे माहौल, वातावरणातील ऊर्जा हे सगळे करणने अनुभवावे, अशी माझी इच्छा आहे. मी तर दरवर्षी या वातावरणाने भारून जाते, आता करणनेही हे सगळे एन्जॉय करावे, अशी माझी इच्छा आहे. जवळच्या सग्या सोयºयांसह दुर्गा मातेच्या विसर्जनात आणि माझ्या पहिल्या ‘सिंदूर खेला’मध्ये मला सहभागी होण्याची माझी इच्छा आहे. पण यावेळी प्रचंड गर्दी असते, यामुळे माझी ही इच्छा पूर्ण होईल वा नाही, ठाऊक नाही. पण मी एक एक क्षण एन्जॉय करणार आहे,असे बिप्स म्हणाली. आता बिप्स एवढी उत्सूक आहे तर तिची ही इच्छा जरूर पूर्ण व्हावी, याच आमच्या शुभेच्छा.