Join us

बिप्स म्हणते,‘करण लाईक्स ‘घर का खाना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 09:55 IST

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे नवदाम्पत्य त्यांच्या हनीमून फिव्हरमधून बाहेर आले असून आता ते त्यांचे करिअर आणि फिटनेसची ...

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे नवदाम्पत्य त्यांच्या हनीमून फिव्हरमधून बाहेर आले असून आता ते त्यांचे करिअर आणि फिटनेसची काळजी करू लागले आहेत. ते दोघेही हेल्थ कॉन्शियस असून ते योगा/ वर्कआऊट करत आहेत.सुट्टयांमधील धम्माल, मजा मस्ती या सर्वांमुळे त्यांच्या आरोग्याकडे थोडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे तिला आता तिचे वजन कमी करावयाचे आहे. तिचा पती करणसिंग ग्रोव्हर तिचे वजन घटवण्यासाठी तिची मदतच करतोय. एवढं तरी बरे आहे की, करणला ‘घर का खाना’ खायला जास्त आवडते.तो त्याच्या खाण्याच्या सवयी माझ्यावर लादत नाही. पण, मलाही आता घरचेच जेवण आवडायला लागले आहे. मात्र, करण मला जेवण बनवण्यासाठी प्रचंड मदत करतो.