Join us

बिप्स-करणचा होणार साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 21:53 IST

बॉलीवूडमधील हॉट कपल बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते कधी लग्न करणार याची उत्सुकता ...

बॉलीवूडमधील हॉट कपल बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते कधी लग्न करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. २०१६ मध्ये आत्तापर्यंत अनेक जोडप्यांचे ब्रेकअप्स आणि घटस्फोट झाल्याचे कळते. त्यात एक आनंदाची बातमी सुत्रांकडून कळाली आहे. बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर म्हणे मार्चमध्ये फायनली साखरपुडा करणार आहेत. या दोघांनी जेव्हा ‘अलोन’ मध्ये एकत्र काम केले तेव्हापासून सर्वांना ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळाले आहे. पण अद्याप त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर मान्य केले नाही.