Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॉडलिंग दिवसांमध्ये अशी दिसायची बिपाशा बसू, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST

मॉडलिंगमधून अभिनय क्षेत्रात आलेली अभिनेत्री बिपाशा बसू ३९ वर्षांची झाली आहे. बिपाशाचा जन्म ७ जानेवारी १९७९ मध्ये दिल्ली येथे एका बंगाली फॅमिलीमध्ये झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथील नेहरू प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर हा परिवार कोलकाता येथे शिफ्ट झाला.

मॉडलिंगमधून अभिनय क्षेत्रात आलेली अभिनेत्री बिपाशा बसू ३९ वर्षांची झाली आहे. बिपाशाचा जन्म ७ जानेवारी १९७९ मध्ये दिल्ली येथे एका बंगाली फॅमिलीमध्ये झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथील नेहरू प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर हा परिवार कोलकाता येथे शिफ्ट झाला. बिपाशाने अल्पावधीतच मॉडलिंग क्षेत्रात भरारी घेतली.मॉडलिंगनंतर बिपाशा २००१ मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आली.या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळाला.आज बिपाशा बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला ब्लॅक ब्युटी या नावानेही ओळखले जाते. परंतु लहानपणी ती खूपच सावळी आणि स्थूल होती.बिपाशानेच एकदा सांगितले होते की, शाळेमध्ये तिच्या पर्सनालिटीमुळे इतर विद्यार्थी तिला घाबरायचे.शालेय जीवनात प्रेमाने तिला ‘लेडी गुंडा’ असेही बोलाविले जात असे.बिपाशाने ‘राज’ या सुपरहिट चित्रपटात आपल्या अदाकारीने सगळ्यांनाच दंग केले होते. यासाठी तिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड कॅटेगिरीमध्ये फिल्मफेअरसाठी नॉमिनेशनही मिळाले होते.आतापर्यंत बिपाशाने ५५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.बिपाशाने करणसिंग ग्रोव्हर याच्याशी विवाह केला. ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.एक वर्ष डेटिंग केल्यानंतर बिपाशाने करणसोबत बंगाली रीतीरिवाजाप्रमाणे ३० एप्रिल २०१६ रोजी विवाह केला.