बिपाशा व करण लवकरच पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 21:52 IST
मागील दीड वर्षापासून पडद्यावरुन गायब झालेले बिपाशा बसू व करण सिंह ग्रोवर ही जोडी सोबतच पडद्यावर परतत आहेत. सूत्रांनी ...
बिपाशा व करण लवकरच पडद्यावर
मागील दीड वर्षापासून पडद्यावरुन गायब झालेले बिपाशा बसू व करण सिंह ग्रोवर ही जोडी सोबतच पडद्यावर परतत आहेत. सूत्रांनी सांगितले की, एका शो निर्मात्याने या दोघांनाही सोबतच काम करण्याची आॅफर दिली आहे. परंतू, त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे कळते. कारण की, लग्नानंतर हे दोघेही सध्या सुटी एन्जाय करीत आहेत. लग्नापासून या दोघांना सोबत काम करण्याच्या अनेक आॅफर येत आहेत. दोघेही पडद्यावर झळकणार असल्याने त्यांचे चाहते हे आनंदीत आहेत. गतवर्षी आलेल्या हॉरर या चित्रपटात अलोन सोबत ते दिसले होते. तो चित्रपट फ्लॉप ठरला पण ही जोडी तेव्हापासून आपल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. ते आता विवाहबंधनातही अडकले आहेत. त्यामुळे चाहत्यांना मागील अनेक दिवसापासून या जोडीची प्रतिक्षा होती. चाहत्यांची ही प्रतिक्षा लवकरच साकार होणार आहे.