Join us

Bigg Boss OTT: रितेश-जेनेलिया 'बिग बॉस'मध्ये होणार सहभागी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:45 IST

Bigg Boss OTT: लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये Bigg Boss OTT अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देयेत्या १८ सप्टेंबर रोजी बिग बॉस ओटीटीचा फिनाले रंगणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. यंदा पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. इतकंच नाही तर प्रथमच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याने केलं. विशेष म्हणजे प्रत्येक पर्वाप्रमाणे यंदाचंही पर्व तुफान गाजलं. घरातील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, मैत्री यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्यातच आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये  Bigg Boss OTT अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी होणार आहेत.

अलिकडेच बिग बॉस ओटीटीमधून नेहा भसीनला रातोरात घरातून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे एकंदरीतच घरातील सगळ्या स्पर्धकांमध्ये धाकधुक सुरु झाली आहे. कधी कोणाचा नंबर लागेल आणि घराबाहेर पडावं लागेल ही एकच चिंता स्पर्धकांना सतावेत आहे. यामध्येच आता या बिग बॉसच्या घरात रितेश आणि जेनेलिया ही जोडी सहभागी होणार आहे. मात्र, ही जोडी स्पर्धक म्हणून नव्हे तर एका खास कारणासाठी येणार आहे.

"मला तर चार मुलं आहेत"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता

येत्या १८ सप्टेंबर रोजी बिग बॉस ओटीटीचा फिनाले रंगणार आहे. या फिनालेमध्ये रितेश-जेनेलिया येणार आहेत.  विशेष म्हणजे रितेश-जेनेलिया स्पर्धकांना सरप्राइज देणार असून याचवेळी ते बिग बॉस ओटीटीचा विजेताही घोषित करणार आहेत.

दरवेळी बिग बॉस विजेत्याचं नाव अभिनेता सलमान खान घोषित करतो. त्याचप्रमाणे यावेळी बिग बॉस ओटीटीचा सूत्रसंचालक विजेत्याचं नाव घोषित करणं अपेक्षित होतं. मात्र, करणऐवजी रितेश-जेनेलिया करणार आहेत. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेल्या ३ स्पर्धकांना बिग बॉस १५ मध्ये थेट एण्ट्री मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये 'या' स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना

सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये ५ स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले असून त्यातून एकाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे. प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत.

टॅग्स :बिग बॉसजेनेलिया डिसूजारितेश देशमुख