Join us

बिग बॉस फेम वीणा मलिकने घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 13:13 IST

वीणा मलिक ही नेहमीच चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असते. बिग बॉस या कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ...

वीणा मलिक ही नेहमीच चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असते. बिग बॉस या कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी अश्मित पटेलसोबत तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. या कार्यक्रमानंतर ती आणि अश्मित लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. पण या कार्यक्रमानंतर त्या दोघांनी ब्रेक अप केले. वीणाने तीन वर्षांपूर्वी असद बशीर खान खट्टक याच्यासोबत विवाह केला होता. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय अचानकच घेतला होता. असद हा दुबईमधील एक व्यवसायिक असून त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय वीणाने घेऊन चाहत्यांना धक्का दिला होता. दुबईमध्ये वीणाची असदसोबत ओळख झाली होती. त्यानंतर केवळ पाचच दिवसांत तिने त्याच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगीदेखील आहे. पण काही दिवसांपूर्वी वीणाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता आणि या घटस्फोटाला कोर्टाने आता मंजुरीदेखील दिली आहे. वीणाने लाहोरमधील फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण यावर असदने त्याची काहीही बाजू मांडली नाही की त्याने कोर्टात हजेरी लावली नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आला. घटस्फोटानंतर आता वीणाला तिने घेतलेल्या मेहरमधील 25 टक्के रक्कम असदला परत करावी लागणार आहे. वीणा नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली आहे. बिग बॉसमुळे तर तिची चांगलीच चर्चा झाली होती. त्याचसोबत एका मासिकांच्या पृष्ठावर तिचे नग्न फोटो छापले असल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता.वीणा आणि असद गेल्या तीन महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. वीणाला अभिनयक्षेत्रात परतायचे होते. पण असदने यासाठी नकार दिल्याने त्यांच्यात भांडणे झाली आणि वीणाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जात आहे.