Join us

'बिग बॉस 17'चं पहिलं एलिमिनेशन; घरामधून 'हा' सदस्य पडला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 15:34 IST

'बिग बॉस'च्या 17 व्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं

'बिग बॉस 17'  हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम स्पर्धकांमुळे तसेच त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे.  'वीकेंड का वार' या सेगमेंटमध्ये 'बिग बॉस'च्या घरातून कोणता सदस्य बाहेर पडेल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'बिग बॉस'च्या 17 व्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं असून अभिनेत्री सोनिया बन्सलला घराबाहेर जावं लागलं आहे. सोनिया ही  'बिग बॉस 17'मधून एक्झिट घेणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.

बिग बॉस या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण या घरात शेवटपर्यंत टिकून राहावं असं वाटतं. पण ते शक्य नसतं.  कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असतं. ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, सोनिया बन्सल, सना रईस खान, खानजादी आणि सनी आर्य उर्फ तहलका भाई हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यात सना रईस खान आणि सोनिया बन्सल यांना सर्वात कमी मते मिळाले. या दोघींमधून कोण स्पर्धक बाहेर पडणार हे ठरवण्याची प्रेक्षकांची जबाबदारी होती. अखेर स्पर्धकांनी सनाला सेफ केले आणि सोनियाला घराबाहेरचा रस्ता दाखवला. 

 सोनिया बन्सल ही व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी काही तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली.  गॉडफादरशिवाय तिने अभिनय क्षेत्रात स्थान निर्माण केलं आहे.

दरम्यान 'बिग बॉस 17' च्या घरात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे, ज्यांची नावे समर्थ जुरेल आणि मनस्वी मामागाई आहेत. मनस्वीने मिस इंडियाचा किताब जिंकला आहे. तर समर्थ एक अभिनेता आहे, जो ईशा मालवीयसोबत 'उदारियां' शोमध्ये दिसला होता.

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटी