Join us

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने उचलले हे मोठे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:33 IST

राज कुंद्राला अटक झाल्यामुळे शिल्पा शेट्टी खूप चिंतेत आहे. त्यामुळे तिने आता हा मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणात दोषी आढळल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला सोमवारी रात्री अटक केली. त्यामुळे शिल्पा शेट्टी खूप चिंतेत आहे. त्यामुळे तिने डान्स रिएलिटी शो सुपर डान्सरच्या शूटिंगला गेली नाही.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत निश्चित होते की शिल्पा शेट्टी डान्स रिएलिटी शो सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनच्या दोन भागांचे शूटिंग करणार आहे. मात्र जसे रात्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अटक झाल्याचे वृत्त समोर आले. तसे शिल्पा शेट्टीने शोचे शूटिंग करण्याबाबतचा निर्णय बदलला.

सुपर डान्सर शोचे शूटिंग नेहमी सोमवारी किंवा मंगळवार पैकी एक दिवसच होते आणि विकेंडच्या दोन्ही भागांचे शूटिंग एकाच दिवशी केले जाते. एबीपी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, सध्याची परिस्थिती पाहता आता शिल्पा शेट्टी शिवाय शोचे इतर दोन परीक्षक गीता कपूर आणि अनुराग बसूसोबत शूटिंग सुरू आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शिल्पा शेट्टीला तिच्या कुटुंबासोबत कोरोनाची लागण झाली होती तेव्हा सुपर डान्सरच्या काही भागांचे शूटिंग शिल्पा शेट्टीशिवाय करावे लागले होते.

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंदाला पोर्नोग्राफी कंटेट बनवल्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे राज कुंद्राच्या विरोधात पुरावे आहेत. क्राइम ब्रँचच्यानुसार राज कुंद्राने या बिझनेसमध्ये १० कोटी रुपये गुंतवले होते.

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी