Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या मानेवर 33 सेंमी लांब ‘लिगेचर मार्क’, नव्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 10:17 IST

सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून नवी तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देकाल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर सीबीआयचे अधिकारी काही क्षण बुचकळ्यात पडले.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाने पुन्हा वेग घेतला आहे.  शनिवारी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली. सोबतच  सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून नवी तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.होय, या रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर 33 सेंमी  लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्क म्हणजे, खोल खूण. सुशांतची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.

रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. फासाची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीआयने दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांची मदत घेऊन पास्टमार्टम अहवालाची तपासणी केली. सुशांतचा  पोस्टमार्टम  रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने लिहिला होता. आता सीबीआय या पाच डॉक्टरांच्या टीमचीही चौकशी करणार आहे. सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम सुरु असताना कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती  जवळपास 45 मिनिटे शवगृहात होती. ती तिथे काय करत होती? सुशांतचा कुठलाही नातेवाईक तिथे नसताना रिया तिथे कशी गेली? याचा तपासही सीबीआय करत आहे. 

काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर सीबीआयचे अधिकारी काही क्षण बुचकळ्यात पडले. कारण सुशांतच्या घरातील जवळपास सर्व वस्तू गायब आहेत. मुंबई पोलिसांच्या परवानगीने घर मालकाने सुशांतचे सर्व सामान काढण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता सर्व घर जवळपास रिकामे झाले आहे. दरम्यान, सीबीआय तपासात सुशांतचा पलंग आणि पंख्या दरम्यानची उंची मुंबई पोलिसांनी केलेल्या पंचनाम्या नुसारच आढळून आली आहे.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत