Join us
Daily Top 2Weekly Top 5

​... म्हणून अनुष्काने घेतला मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 22:14 IST

अनुष्का व विराट कोहली यांचे नाते आता लपून राहिलेले नाही. आधी त्यांच्यात प्रेम फुलल्याची बातमी आली. मग ब्रेकअपची आणि ...

अनुष्का व विराट कोहली यांचे नाते आता लपून राहिलेले नाही. आधी त्यांच्यात प्रेम फुलल्याची बातमी आली. मग ब्रेकअपची आणि नंतर पॅचअपची. पण यादरम्यान अनुष्का वा विराट दोघांनीही बोलणे टाळले. आजही हे कपल आपल्या रिलेशनबाबत काहीही न बोलण्यासच प्राधान्य देते. एका मुलाखतीत अनुष्काला याबाबत छेडण्यात आले. या मुलाखतीत तिला तिच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण मी या प्रश्नाचेअजिबात उत्तर देणार नाही, असे अनुष्काने ठणकावून सांगितले आणि मग स्वत:च असे का, यामागचे कारणही सांगितले. आधी मी माझ्या रिलेशनशिपबाबत जाहिरपणे बोलून पाहिले. पण मी जे काही बोलले ते छापण्यापेक्षा त्याचा विपर्यासच अधिक व्हायला लागला. माझ्या चित्रपटांतील कामगिरीपेक्षा माझ्या खासगी आयुष्याबद्दलच मीडियाचा इंटरेस्ट वाढला आणि मग माझ्यावर जिथे जाईल तिथे या व अशाच प्रश्नांचा भडिमार व्हायला लागला.  पाश्चिमात्य देशांमध्येही अनेक कलाकार त्यांच्या मुलाखतीतून खासगी आयुष्यावर बोलतात. पण, तो त्यांच्या मुलाखतीतला एक भाग असतो. आपल्या इथे मात्र याविरुद्ध परिस्थिती आहे. इथे मुलाखतच पूर्णपणे खासगी आयुष्य, रिलेशनशिप्सच्या अनुषंगाने वळवली जाते. त्यामुळेच मी जाणीवपूर्वक माझ्या खासगी आयुष्याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला आहे, असे अनुष्काने सांगितले. शेवटी हा अनुष्काचा निर्णय.. कारण सेलिब्रिटीला पर्सनल आयुष्य नसते, हे तिला कोण पटवून देणार!