Join us

बिग बजेट चित्रपटांची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:12 IST

 २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा त्याचा सिंग इज ब्लिंग चित्रपटाचा बजेट १00 कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. आणि ...

 २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा त्याचा सिंग इज ब्लिंग चित्रपटाचा बजेट १00 कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. आणि अपेक्षा आहे की हा चित्रपट कमीत कमी १५0 कोटीचा व्यवसाय करेल. अक्षय कुमार नंतर पुढच्या शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी जज्बा मधून मोठय़ा काळानंतर ऐश्‍वर्या रॉय-बच्चन परतणार आहे. या चित्रपटाचा बजेट ५0 कोटीच्या आसपास आहे. २३ ऑक्टोबरला शाहिद कपूरचा शानदार प्रदर्शित होणारआहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट आहे. लग्नानंतर शाहिदचा हा पहिला चित्रपटआहे. आलिया भट्टला लकी गर्ल मानले जाते आणि शाहिदसोबत तिची जोडी पहिल्यांदा पडड्यावर येत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाचा बजेट ७५ कोटी आहे.१२ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेमचे पुनरागमन होणार आहे. राजश्रीमध्ये सूरज बडजात्यासोबत सलमानच्या चित्रपटावर सर्वांच्या अधिक नजरा आहे. यामध्ये सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे अँक्शन जास्त राहणार नाही. जाणकारांकडून तर त्याचा बजेट १२0 कोटीपेक्षाही जास्त सांगितला जात आहे. २७ नोव्हेंबरला रणबीर कपूरचा तमाशा चित्रपट येणारआहे, ज्याचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे. बेशरम, रॉय आणि बाँबे वेलवेट नंतर रणबीरच्या कॅरिअरसाठी या चित्रपटाला महत्त्वाचे मानले जात आहे.४ डिसेंबरला विधू विनोद चोपडांच्या कंपनीचा वजीर प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर आहे. या चित्रपटाचा प्रोडक्शन खर्च खूप जास्त आहे. या वषार्ची सर्वात मोठी टक्कर १८ डिसेंबरला होणार आहे, ज्यावेळी शाहरुख खानच्या कंपनीमध्ये बनलेल्या दिलवालेचा सामना संजय लीला भंसालींच्या बाजीराव मस्तानीशी होणारआहे. अंदाजानुसार शाहरुख खानच्या चित्रपटाचे पारडे जड मानले जात आहे. दिलवालेचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक वर्षांनंतर शाहरुख आणि काजोलची जोडी परत येतआहे. भंसाली यांच्या चित्रपटालाही कमी लेखले जात नाही. यामध्ये दीपिका, रणबीर सिंह आमि प्रियंका यांचे त्रिकुटआहे, भंसाली नेहमी भव्य चित्रपट करत आले आहे. भूतकाळाला आठवले तर २00७ मध्येअशाच प्रकारच्या सामन्यात शाहरुखची ओम शांति ओमचा सामना भंसालींच्या सांवरियासोबत झाला होता आणि सांवरियाला चित करीत ओम शांती ओम सुपर हिट ठरली होती. बजेट नुसार पाहिले तर दोघांचाही बजेट मोठा आहे. जानकारांच्या मते दिलवालेचा बजेट १३0 करोड आणि बाजीराव मस्तानीचा बजेट १६0 करोडच्या आसपास आहे. व्यवसायाच्या दृष्टीने दोघांकडून मोठय़ा अपेक्षा आहे. दिलजलच्या २00 करोडच्या क्लबमधील इंट्री नंतर ३00 करोड पर्यंत पोहचण्याची चर्चा केली जातआहे.आकड्यांच्या या खेळात कोण किती बाजी मारणार हे तर येणारा काळत सांगेल. सध्या अपेक्षापेक्षा जास्त काही नाही मात्र यात दुमत नाही की या तीन महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार्‍या दिग्गजांच्या चित्रपटांचे परिणाम बॉलीवूडची दशा आणि दिशा निश्‍चित ठरविणारआहे. चित्रपटांच्या व्यवसायाच्या दृष्टीने वर्षातील शेवटच्या तीन महिन्यांवर नेहमी बॉलिवूडच्या व्यावसायिक तज्ज्ञांची करडी नजर असते. परंपरेनुसार या तीन महिन्यांमध्ये मोठे चित्रपट पडद्यावर येतात, ज्यांच्याकडून मोठय़ा व्यवसायाची अपेक्षा असते. या वेळच्या या तीन महिन्यांचा विचार केला तर या काळात अनेक असे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ज्यांच्याकड.ून मोठय़ा अपेक्षा आहे. या तीन महिन्यात अमिताभ बच्चन पासून सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, शाहिद कपूर आणि अक्षय कुमार प्रेक्षकांसमोर येणारआहेत.