Join us

बिग बॉस मध्ये नाही होणार ऐ दिल है मुश्किलचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 14:36 IST

ऐश्वर्या रॉय -बच्चन ही सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ मध्ये आपल्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ चे प्रमोशन करणार ...

ऐश्वर्या रॉय -बच्चन ही सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ मध्ये आपल्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ चे प्रमोशन करणार असल्याची अलीकडे चर्चा होती. परंतु,  सलमानच आपल्या या शो मध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करणार नसल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचे कारण ऐश्वर्या नसून दुसरे कोण आहे. या चित्रपटात रणबीर सिंग सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे. सलमान व रणबीरचे नाते कसे आहे, हे सर्वांना माहिती आहे.रणबीरचा चित्रपट ‘तमाशा’ चे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉस च्या सेटवर रणबीर न दिसता  चित्रपटाची अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसली होत. आता होऊ शकते की, चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहर आपल्या चित्रपट प्रमोशनसाठी सलमानला तयार करेल. व बिग बॉस च्या सेटवर करण सोबत अनुष्का शर्मा दिसेल. करण ‘शुध्दि’ या चित्रपटातही सलमानला प्रमुख भूमिका देणार होते. परंतु, शेवटी या चित्रपटासाठी वरूण धवन व आलिया भट्टचे नाव जाहिर करण्यात आले.