Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बिग बी करणार ‘सावधान इंडिया’चे सूत्रसंचालन !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:18 IST

 'सावधान इंडिया' शोमध्ये ''जुर्म का सामना डर के नही डट के करो'' ही विशेष मोहिम सुरू होत असून याचा ...

 'सावधान इंडिया' शोमध्ये ''जुर्म का सामना डर के नही डट के करो'' ही विशेष मोहिम सुरू होत असून याचा मुख्य भर तरुणांना सहभागी करुन घेण्यावर असेल. यासाठी बिग बी अमिताभ दोन एपिसोड शूट करेल. यातून  बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सूत्रसंचालन करीत असताना दिसणार आहे. 'आज की रात है जिंदगी' हा शो अमिताभने गेल्यावर्षी होस्ट केला होता. आता 'सावधान इंडिया' या लाईफ ओके वाहिनीवरील शोमध्ये खास भागात अमिताभ दिसणार आहे. 'सावधान इंडिया'मध्ये सत्य घटनांवर आधारित गुन्हेगारीच्या कथा दाखवण्यात येतात. अमिताभचा हा विशेष भाग पुढील महिन्यात प्रसारित होईल.गुन्हेगारीच्या केसमध्ये अडकलेल्या तीन मुलींची कथा 'पिंक' चित्रपटात मांडण्यात आली असून अमिताभ यात वकिलाची भूमिका साकारत आहे. शूजित सरकार निमार्ता असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुध्द रॉय चौधरी यांनी केलेय. 'पिंक' चित्रपटात तापसी पन्नू, कृती सेनन, अँड्रा तारींग, पियुष मिश्रा, अंगद बेदी, धृतीमन चटर्जी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.