अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरही आपले तितकेच वर्चस्व निर्माण केले आहे. कौन बनेगा करोडपती या मालिकेतील त्यांच्या सूत्रसंचालनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. गेल्या वर्षी आज की रात है जिंदगी या कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती आणि आता ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. सावधान इंडिया या कार्यक्रमाच्या दोन भागांचे ते सूत्रसंचालन करणार आहेत. सावधान इंडियाची जुर्म का सामना डर के नही डट से करो ही नवी सीरिज सुरू होत आहे. या सीरिजमधील दोन भागांमध्ये ते पिंक या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.
बिग बी म्हणणार सावधान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:35 IST