Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ बिग बी म्हणाले, ‘ऐ दिल है मुश्किल’ चा टीजर मी पाहिलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 22:30 IST

‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या ‘हॉट केमिस्ट्री’ची सध्या जोरदार चर्चा ...

‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या ‘हॉट केमिस्ट्री’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि  टीजर पाहिल्यानंतर तर ही चर्चा आणखीच ‘हॉट’ झाली आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याच्या ‘हॉट सीन्स’ वर अमिताभ बच्चन नाराज  असल्याची बातमी मध्यंतरी आली होती. त्यामुळे साहजिक   ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर पाहिल्यानंतर अमिताभ यांची प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यात सगळ्यांच रस असणार. एका कार्यक्रमादरम्यान ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर पाहिला काय? असा थेट प्रश्न अमिताभ यांना  प्रश्न विचारण्यात आला.   यावर मी अद्याप ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर पाहिलेला नाही, असे उत्तर बिग बी यांनी दिले. यापूर्वी ऐश्वर्याचा ‘जज्बा’ आणि ‘सरबजीत’बद्दल टिष्ट्वट केले होते. पण ‘ऐ दिल है मुश्किल’बद्दल मात्र अमिताभ अवाक्षरही बोलायला तयार नाहीत. असे का? हे शेवटी तेच जाणोत...