Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बी म्हणाले,‘ मी बेसुरा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 11:17 IST

 अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला एक स्थैर्य आणि गंभीरता आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष म्हणजे त्यांचा आवाजच आहे. पण, ते स्वत:ला ...

 अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला एक स्थैर्य आणि गंभीरता आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष म्हणजे त्यांचा आवाजच आहे. पण, ते स्वत:ला ‘बेसुरा’ का मानतात? हेच कळत नाही.वेल, आता हे यामुळे कळाले की, त्यांचा आगामी चित्रपट ‘टी३न’ चे म्युजिक लाँचिंग होते. तेव्हा त्यांनी त्यांचा आवाज ‘क्यूँ रे’ गाण्याला लावला. ते म्हणाले,‘ संगीतकार क्लिंटॉन सेरेजो म्हणाले, मला हे गाणे एखाद्या हतबल माणसाने म्हटल्यासारखे हवे होते. खरंतर मला गायन आवडत नाही. मी सगळ्यांसमोर कधीही गात नाही.मी गायनाबद्दल खुपच क ॉन्शियस आहे. कुटुंबासमोरच फक्त मी गातो. क्यूँ रे हे गाणे कै.आदेश श्रीवास्तव स्टुडिओ येथे रेकॉर्ड करण्यात आले होते. मी प्रथम हे गाणे गायले होते. पण, ते एवढे काही चांगले झाले नव्हते.’