Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिताच्या आठवणींत बिग बी ‘नॉस्टेलजिक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:18 IST

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी चतुरस्र अभिनेत्री स्मिता पाटीलच्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांसोबत ‘नमक हलाल’ चित्रपटाचे फोटो शेअर केले. दोघांनी ...

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी चतुरस्र अभिनेत्री स्मिता पाटीलच्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांसोबत ‘नमक हलाल’ चित्रपटाचे फोटो शेअर केले. दोघांनी या चित्रपटात एकत्र काम केले होते. नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 34 वर्षे पूर्ण झाले. स्मितासोबत काम करताना आलेला अनुभव सांगताना बिग बी म्हणाले की, ‘नमक हलाल’ चित्रपटाला 34 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मिताच्या आठवणींनी मन भरून आले आहे. एक गोष्ट मला आजही आठवते की, या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी ती फार नर्व्हस होती. कारण चित्रपटातील तिची भूमिका तिला उमजतच नव्हती.ते पुढे म्हणाले की, पण स्मितासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीने मन लावून तो चित्रपट पूर्ण केला. तिचा अभिनय तर लाजवाबच! एकाच वेळी तरल आणि बळकट होऊ शकणारी स्त्री होती. तिच्या निधनामुळे आपण एक फार मोठ्या कलाकाराला मुकलो आहोत.}}}}वुई अल्सो मिस यू स्मिता.