शूटिंगदरम्यान 'बीग बी' जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:21 IST
भारतीय सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती स्वत: ...
शूटिंगदरम्यान 'बीग बी' जखमी
भारतीय सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती स्वत: बीग बींनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. टीन या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ यांना अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. काळजीची बाब नाही. वेदना होत आहे, पण दुखापत झालेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बर्फ लावत असून पेनकिलरही घेतली आहे. 48 तासांत बरा होईन, असे डॉक्टरांनी सांगितले. टीन एक थ्रिलर चित्रपट असून अमिताभ मागील अनेक दिवसांपासून कोलकातामध्ये शूटिंग करत आहेत. या सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'टीन 'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात ते स्कूटर चालविताना दिसत आहेत.